- जळगाव -जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (कोविड रुग्णालय) भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण कक्षातून बाहेर पडणे, अहवाल येण्यापूर्वीच रुग्णांना डिस्चार्ज देणे असे प्रकार घडलेले आहेत. अशातच भुसावळ येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेली ८५ वर्षीय वृद्ध महिला मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सविस्तर वाचा -कोविड रुग्णालयाचा भोंगळ कारभार, भुसावळची ८५ वर्षीय पॉझिटिव्ह वृद्धा बेपत्ता
- मुंबई -कोकण किनारपट्टीसह इतर काही जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपूर्वी निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. या वादळामुळे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये शाळांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या शाळांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
सविस्तर वाचा -चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या शाळांचे तातडीने पंचनामे करा, वर्षा गायकवाड यांचे आदेश
- पुणे -भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पुण्याच्या जलवाहिनीवरील मोर्चा स्थगित करुन गावागावांत कुटुंबासह जलसमाधी घेणार असल्याचे सांगितले. आज (रविवार) देवतोरणे, कुदळवाडी गावातील धरणग्रस्त शेतकरी संपुर्ण कुटुंबासह भामा-आसखेड धरणाच्या पाण्यात उतरले आहेत.
सविस्तर वाचा -भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी कुटुंबासह जलसमाधीच्या तयारीत
- मुंबई- आरे जंगलात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा मोठ्या प्रमाणात झाडे कापत वा जाळत झोपड्या बांधल्या जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. मात्र, आरेत कुठेही अतिक्रमण होत नसल्याचे म्हणत आरे कॉलनी प्रशासनाने आरोप धुडकावून लावला आहे.आता यावरून प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी असा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.
सविस्तर वाचा -आरेत झाडे तोडत अतिक्रमण! पर्यावरणप्रेमींचा आरोप; प्रशासनाचा मात्र इन्कार
- सिंधुदुर्ग -कुडाळ पिंगुली येथील ठाकर आदिवासी लोक कलावंत शिवदासकुमार गणपत मस्के या तरुणाने कळसूत्री बाहुल्यांच्या व्हिडिओमधून कोरोनाशी कसे लढाल, यावर प्रबोधन करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ हा लोककलेतील एक प्रभावी व लोकप्रबोधनकारी खेळ मानला जातो.
सविस्तर वाचा -कोरोनाविरुद्ध कसे लढाल.. लोक कलावंताचे कळसूत्री बाहुल्यांच्या व्हिडिओतून प्रबोधन
- बेळगाव (कर्नाटक) - जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आणि सामुहिक प्रसार झालेले हिरेबागेवाडी गाव हे कोरोनामुक्त झाले आहे. या गावातील लोकांनी फटाके फोडून याचा आनंद साजरा केला.