महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..

By

Published : Feb 7, 2021, 7:32 AM IST

Updated : Feb 7, 2021, 10:56 PM IST

  • मुंबई -महाराष्ट्राने कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्याने आणि पारदर्शकपणे पावले उचलली आणि त्यामुळेच दर दशलक्ष लोकसंख्येचा विचार केला, तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग आणि मृत्यूदर महाराष्ट्रात कमी आहे, असे दिसते, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

सविस्तर वाचा :अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू दर महाराष्ट्रात कमी

  • पालघर - एका नौदल सैनिकास पैशाच्या वादातून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७) असे नौदलात सैनिक पदावर कार्यरत असलेल्या तरुणाचे नाव आहे. सुरजकुमारचे तीन अज्ञातांनी चेन्नई विमानतळावरून अपहरण करून १० लाख रुपयांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने ५ फेब्रुवारी रोजी तलासरी तालुक्यातील वेवजी गावानजीकच्या जंगलात आणून त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सविस्तर वाचा :पालघर : नौदल सैनिकाचे अपहरण करून अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले

  • रांची :नौदलाचा जवान सुरज कुमार दुबे याची हत्या हे एक मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केले आहे. सुरजचे चेन्नईतून अपहरण करण्यात आले होते, त्यानंतर महाराष्ट्राच्या पालघरमध्ये त्याला जिवंत जाळण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. यामागे खंडणीचे कारण असल्याची माहिती त्याच्या जवाबानुसार पोलिसांनी दिली होती. मात्र, हा दावा त्याच्या कुटुंबीयांनी फेटाळला आहे.

सविस्तर वाचा :नौदल जवान हत्या प्रकरण : कुटुंबीयांनी खंडणी मागितल्याचा दावा फेटाळला; हे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप

  • चामोली - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यावर मोठं नैसर्गिक संकट ओढवलं आहे. रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे. 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आली आहे.

सविस्तर वाचा -उत्तराखंड हिमप्रलय लाईव्ह अपडेट्स : सुमारे 150 बेपत्ता, 10 जणांचा मृत्यू...

  • बुलडाणा -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्या पायगुणाने ऑपरेशन लोटस यशस्वी होणार असल्याच्या चर्चेवर पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता उन्हाळा आला, तलाव सुकलेत, आता कशाचा आला लोटस. महाविकास आघाडीची सत्ता ५ वर्षे स्थिर असून १५ वर्षे ही आघाडी चालणार असल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

सविस्तर वाचा -अमित शहांच्या पायगुणांनी सत्ता येण्यापेक्षा राज्यामध्ये शांतता निर्माण व्हावी - वडेट्टीवार

  • सांगली -सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे सांगली अध्यक्ष सुनील फराटे यांनी पत्र पाठवून बँकेच्या घोटाळ्याची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा -सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी थेट पंतप्रधानांकडे तक्रार

  • सिंधुदुर्ग :नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सिंधुदुर्गमध्ये आले होते. यावेळी उद्घाटनानंतर आपल्या भाषणामध्ये त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. जनमताचा अनादर करत, पवित्र युती सोडून शिवसेनेने सत्तेसाठी लाचार होत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असे शाह यावेळी म्हणाले.

सविस्तर वाचा -पवित्र युती सोडून शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली; अमित शाहांचा हल्लाबोल

  • पुणे -2006 साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होते, त्यादरम्यान त्यांनी काँट्रॅक्ट फार्मिंग अ‌ॅक्ट हा कायदा केला आणि आता तोच कायदा केंद्र सरकारने जसाच्या तसा स्वीकारला आहे. आता राज्यसरकार मधील सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी जर हा कायदा रद्द केला, तर केंद्राला कृषी हा विषय राज्याचा असल्याने तो त्यांना लागू करता येणार नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने तो कायदा रद्द करावा याच भूमिकेत आम्ही आहोत. राज्य सरकार हा कायदा रद्द का करत नाही, याचा खुलासा त्यांनी करावा. जो पर्यंत हा कायदा रद्द करत नाही, तो पर्यंत राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा -कृषी कायद्यांबाबत राज्य सरकारची दुटप्पी भूमिका - प्रकाश आंबेडकर

  • बारामती - शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे. शेतकऱ्यांची अस्वस्था पाहून केंद्र सरकार मधील वरिष्ठ मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालयला हवे होते. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. ते बारामतीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी पीयुष गोयल यांच्यावरही निशाणा साधला.

सविस्तर वाचा -केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी : शरद पवार

  • मुंबई - पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात मुंबईत काँग्रेसचे भाजप सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधातही काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. अर्थमंत्री आज मुंबईत येणार आहेत. त्यामुळे तर कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झाले आहेत.

सविस्तर वाचा-मुंबईत काँग्रेसचे आंदोलन, निर्मला सीतारामन यांच्याविरोधात घोषणाबाजी

Last Updated : Feb 7, 2021, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details