- यवतमाळ - घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओचा डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली होती. डॉक्टरांचा हलगर्जीपणा निष्पाप बालकांच्या जीवावर बेतला असून या प्रकरणी केंद्रावरील आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी या तिघांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तत्काळ निलंबित केले आहे.
चिमुकल्यांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी तिघांचे निलंबन
- मुंबई -अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकल्यावर हा निवडणुकीचा जाहीरनामा होता, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्पपत्र होते, हाच प्रश्न पडला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मोदी सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून ज्या राज्यात निवडणुका आहेत त्याच राज्यात विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची नवी पद्धत समोर आली आहे. ज्या राज्यात निवडणुका नाहीत त्या राज्यात काही द्यायचेच नाही हे केंद्र सरकारचे धोरण आहे.
अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्पपत्र - बाळासाहेब थोरात
- कोल्हापूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामधून नेमकं काय जाहीर केले आणि कोणासाठी केले हाच केवळ मोठा प्रश्न आहे. पोकळ दावे आणि त्या दाव्यांचे बुडबुडे यांच्याशिवाय या बजेटमध्ये काहीच नाही. शिवाय कृषी क्षेत्राला तर भला मोठा भोपळा त्यांनी दिला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. शिवाय अनेक घोषणा यापूर्वी सुद्धा केल्या होत्या, नवीन काय केले हे सांगा. नेहमीप्रमाने यावेळी सुद्धा बजेटमधून निराशा हाती लागल्याचेही शेट्टींनी म्हटले.
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी केवळ पोकळ दावे, कृषी क्षेत्राला भोपळा - राजू शेट्टी
- आजच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेले नाही. ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांसाठी केंद्राचा हाथ सैल आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्या वाट्याला उपेक्षा आली असून, रोजगार निर्मितीबद्दल कोणत्याही योजना या अर्थसंकल्पात नाही. जर केंद्र डिजिटल जनगणना करणार असेल, तर त्यांनी ओबीसींची जनगणनाही करावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हात सैल - भुजबळ
- पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी, हा अर्थसंकल्प अपेक्षापूर्ती करणारा असल्याचे म्हटले आहे.
अर्थसंकल्प अपेक्षापूर्ती करणारा - चंद्रकांत पाटील
- नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर व नाशिक मेट्रोसाठी निधीची घोषणा आहे.