महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM

By

Published : Jan 29, 2021, 6:31 AM IST

Updated : Jan 29, 2021, 1:24 PM IST

  • राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आम्ही 16 राजकीय पक्षांच्या वतीने निवेदन जारी करत आहोत, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, सपा, आरजेडी, माकप, सीपीआय, आयआयएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ काँग्रेस (एम) आणि एआययूडीएफ यांनी संयुक्तपणे घेतला आहे.

सविस्तर वाचा-LIVE UPDATES : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण

  • नवी दिल्ली -कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. लाल किल्ल्यावरील घटनेच्या आडून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कब्जा केला होता. निशाण साहीबचा ध्वज किल्ल्यावर फडकावला. आंदोलकांसोबत पोलिसांची झटापट झाली तसेच तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता सरकारकडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होत आहे.

सविस्तर वाचा-'लाल किल्ल्यातील घटनेआडून सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या नाकारू शकत नाही'

  • मुंबई -मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात सुरू करण्यात येत असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे मुंबईकरांबरोबरच राज्यातील, देशातील आणि परदेशातील पर्यटकसुद्धा भारतातील अग्रगण्य अशा मुंबई महापालिकेच्या इमारतीचा वारसा पाहण्यासाठी येतील. यातून या वास्तुचा आणि मुंबईचा इतिहास आणि महत्व त्यांना कळण्याबरोबरच मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा-मुंबईच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • मुंबई - राज्यात आज 538 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 187 (73 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात आज सर्वाधिक लसीकरण धुळे जिल्ह्यात (111 टक्के) झाले असून, त्या पाठोपाठ बीड, पालघर, नांदेड, सिंधुदुर्ग आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 19 हजार 696 कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

सविस्तर वाचा-राज्यात गुरुवारी 40 हजार 187 आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस

  • सिंधुदुर्ग- जिल्हा नियोजनाच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासाच्या मुद्यावर मी आक्रमक झालो होतो, अशी भूमिका आजच्या बैठकीनंतर खासदार नारायण राणे यांनी मांडली. तर कोणतीही बाचाबाची झाली नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंती उदय सामंत यांनी दिले आहे. त्यामुळे आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर नेत्यांनी सारवासारव केली असली तरी राणे आणि राऊत एकमेकांना भिडल्याने काही काळ राजकारण चांगलेच तापले होते.

सविस्तर वाचा-राणे म्हणतात मी विकासाच्या मुद्यावर आक्रमक, पालकमंत्री म्हणाले बाचाबाची झालीच नाही

  • मुंबई -शहरातील तिरा कामत या चिमुकलीवर एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. मात्र, तिला स्पायनल मस्क्युलर अट्रोफी (SMA) हा दुर्धर आजार आहे. या आजारातून बरे व्हायला जीन थेरपी या इंजेक्शनची गरज असते. त्याची किंमत सुमारे १६ कोटी एवढी आहे. तिराच्या आई-वडिलांनी फंडींगमधून ही रक्कम उभी केली. मात्र, या इंजेक्शनवर दोन ते तीन कोटींचा आयात शुल्क आहे. त्यामुळे, तिराच्या आई वडिलांपुढे पुन्हा एक नवे संकट उभे ठाकले आहे. आता तिराच्या आईवडिलांनी मदतीसाठी केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार सुरू केले आहे.

सविस्तर वाचा-दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी आई वडिलांनी जमा केले 16 कोटी

  • मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पासाठी राज्यातील शेतकरी, व्यापारी व अर्थतज्ज्ञ यांनी विविध अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

सविस्तर वाचा-जाणून घ्या, केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी महाराष्ट्राच्या अपेक्षा

  • सोलापूर - सैफुल येथील भंगरेव्वा महादेव बागदुरे (वय 81 वर्ष, रा नरेंद्र नगर, सैफुल, सोलापूर) या वृद्ध महिलेवर त्यांच्याच दोन सुना, एक मुलगा आणि एका नातूने मोठा घात केला आहे. त्यांनी भंगरेव्वा यांना वेळोवेळी मारहाण करून त्यांच्याकडील पतसंस्थेत असलेली 90 लाख रुपयांची रक्कम काढून घेतली आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.

सविस्तर वाचा-सोलापूर : वृद्धेला मारहाण करून फसवणूक; मुलासह सून, नातवाला अटक

  • नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपनी अ‌ॅमेझाॅनकडून फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्त अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) तपास सुरू केला आहे. ईडीने नुकतेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाशी संपर्क साधून अ‌ॅमेझाॅन व फ्लिपकार्टने विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याचे म्हटले होते.

सविस्तर वाचा-अ‌ॅमेझॉन ईडीच्या रडारवर...फेमा कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप

  • मुंबई : कॉम्रेड बलविंदर सिंग हत्या प्रकरणातील दुसऱ्या फरार आरोपीला पकडण्यात पंजाब पोलिसांना यश मिळाले आहे. मुंबई विमानतळावरुन हा आरोपी दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. इंद्रजीत सिंग असे या आरोपीचे नाव आहे. इंद्रजीतने आपला साथीदार गुरजीत सिंग यासोबत मिळून बलविंदर सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या केली होती.

सविस्तर वाचा-बलविंदर सिंग हत्या प्रकरण : फरार आरोपीला मुंबई विमानतळावरुन अटक

Last Updated : Jan 29, 2021, 1:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details