- औरंगाबाद -मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना क्रांती चौक येथे घडली. विष पिताना तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरू केले होते. पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी वेळीच तरुणाला रोखले. तरुणाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
औरंगाबादेत मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
- वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या जो बायडेन यांचा शपथविधी सोहळा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरीस या उपाध्यक्ष पदाची शपथ घेतील. यानंतर बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष ठरणार आहेत. तर कमला हॅरीस या देशाच्या पहिल्याच महिला उपाध्यक्ष असणार आहेत.
अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन यांनी घेतली शपथ!
- मुंबई -भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता सर्वांना आयपीएलच्या नव्या पर्वाचे वेध लागले आहे. काही महिन्यांपूर्वी यूएईमध्ये आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्यात आला. यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर सरशी साधत पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. आता नव्या पर्वात आयपीएलमधील सहभागी फ्रेंचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
कोण आत,कोण बाहेर? वाचा आयपीएलमधील सर्व संघांच्या 'रिटेन-रिलिज' खेळाडूंची यादी
- हैदराबाद :कमला देवी हॅरिस, विवेक मूर्ती, गौतम राघवन, माला अडिगा, विनय रेड्डी, भरत राममूर्ती, नीरा तांडेन, सेलिन गौंडर, अतुल गावंडे ही काही भारतीय नावे आहेत; ज्यांना यापूर्वी कधीच नव्हते इतके व्हाईट हाऊसच्या अति-अंतर्गत वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकन उपाध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांचे नाव २०२०च्या प्रचार मोहिमेत प्रथम अवतरल्यापासून काही आठवड्यांच्या आतच ही नावे अमेरिकन सत्तावर्तुळात फिरत आहेत.
कोण आहेत बायडेन प्रशासनातील 'भारतीय' योद्धे; वाचा एका क्लिकवर..
- मुंबई - 'तांडव' वेब सीरिज प्रकरणी आमच्याकडे तक्रार आलेली असून नियमानुसार या संदर्भात कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. याबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेब सीरिजच्या बाबतीत केंद्र शासनाने कायदे व नियम बनवायला हवेत, असे गृहमंत्री देशमुख यांनी केंद्र सरकारला सुचवले आहे.
- नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी टिकरी सीमेवरील एका आंदोलन शेतकऱ्याने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या शेतकऱ्याचा रात्री 2:30 वाजता मृत्यू झाला आहे. संबधित शेतकऱ्यांची ओळख पटली असून जय भगवान असे त्यांचे नाव आहे. ते हरयाणाच्या रोहतकमधील पाकिस्मा गावातील रहिवासी आहेत.