- मुंबई - बुधवारी (दि. २ डिसेंबर) राज्यात ५ हजार ६०० नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ३२ हजार १७६ वर पोहोचला आहे. राज्यात आज १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ३५७ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात ८८ हजार ५३७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा-राज्यात ५ हजार ६०० नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, १११ रुग्णांचा मृत्यू
- अकोला - समोरून येणाऱ्या मोटरसायकलला टाटा 407 ट्रकची धडक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी तेल्हारा तालुक्यातील आडसूळ नजीक शेगाव अकोट रोडवर हा अपघात झाला.
सविस्तर वाचा-शेगाव-अकोट रोडवर कापसाने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
- मुंबई -सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय आज (बुधवार) मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असून, महाराष्ट्रात आता वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करण्यात आली आहे. वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे द्यावीत, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
सविस्तर वाचा-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय; सामाजिक न्याय विभागाने मांडला होता प्रस्ताव
- रत्नागिरी- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची लोटे येथील मालमत्ता स्थानिक ग्रामस्थ रविंद्र दत्ताराम काते यांनी लिलावात घेतली आहे. काते यांनी लिलावात भाग घेऊन व सर्वाधिक बोली लावून १ कोटी १० लाख १० हजार ५१ या किमतीला ही मालमत्ता खरेदी केली . सेफेमा यांनी हा ऑनलाईन लिलाव मंगळवारी (१ डिसेंबर) आयोजित केला होता, हा लिलाव स्थानिक ग्रामस्थ रविंद्र काते यांनी जिंकला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरचा लिलाव व्हिडीओ कॉन्सफरन्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.
सविस्तर वाचा-दाऊद इब्राहिमच्या लोटेतील मालमत्तेचा लिलाव, ग्रामस्थ रविंद्र कातेंनी जिंकली बोली
- नवी दिल्ली -राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असतानाच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारबरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली. शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी दिल्लीतील ९ स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रुपांतर करण्यास परवानगी न दिल्याने केंद्र सरकार माझ्यावर नाराज असल्याचे केजरीवाल म्हणाले.
सविस्तर वाचा-'स्टेडियमचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी नाकारल्यानं केंद्र सरकार नाराज'
- मुंबई- मुंबईतील फिल्म सिटी मुंबईतून काही हलणार नाही. सर्व कलाकार तिथे जाणार नाहीत. मुंबई दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी नवीन फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केल्यानंतर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ई-रिक्षाचे अनावरण केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत नाहीत.