- परभणी - 'माजी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याप्रमाणे तारीख पे तारीख देण्याचे काम मी करणार नाही. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेले खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम आता माझ्याकडे आहे. मात्र, मी रस्त्यांच्या कामांवर कटाक्षाने लक्ष ठेवून आहे. ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज परभणीत सांगितले. तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही चव्हाण म्हणाले.
सविस्तरवाचा :खड्डे बुजवण्याचा चंद्रकांत पाटलांचा कार्यक्रम आता माझ्याकडे; मंत्री अशोक चव्हाणांचा टोला
- मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर राज्यपाल नियुक्त त्या 12 जागांच्या संदर्भात चर्चा झाली आहे. यासाठी आज पवार व मुख्यमंत्री यांची आज वर्षा बंगल्यावर एक बैठक पार पडली. तब्बल एक तासाहून अधिक वेळ चाललेल्या या बैठकीमध्ये विधानपरिषदेच्या त्या 12 जागा सोबतच राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातील कोरोनाची परिस्थिती तसेच मराठा आंदोलकांकडून सुरू असलेली आक्रमक भूमिका आणि त्या आडून विरोधकांचे डावपेच आदी विषयावर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.
सविस्तरवाचा :शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात 'त्या' 12 जागांसाठी पुन्हा एकदा चर्चा
- मुंबई - आज राज्यात ६ हजार १९० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज ८ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ३ हजार ५० कोरोनाबाधित बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के एवढे झाले आहे.
सविस्तरवाचा :राज्यात ६ हजार १९० नवीन कोरोना रुग्णांची वाढ; १२७ मृत्यू
- जालना- वारकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आत्तापर्यंत अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, या सर्व प्रकाराला विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा होता. एवढेच नव्हे तर उद्योगमंत्री देसाईदेखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. मात्र, उद्धव ठाकरे हे सत्तेत येताच त्यांना वारकऱ्यांचा विसर पडला आहे, असा आरोप वारकरी प्रबोधन सेवा मंडळाने केला आहे.
सविस्तरवाचा : उद्धव ठाकरे सत्तेत आले आणि वारकऱ्यांचा विसर पडला; वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचा आरोप
- वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका अवघ्या चार दिवसांवर आल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडने फ्लोरिडात प्रचार सभा घेत असताना अचानक पाऊस आला. मात्र, त्यांनी भाषण सुरूच ठेवले. त्यामुळे नेटकऱ्यांना शरद पवारांच्या साताऱ्यातील वादळी सभेची आठवण झाली.
सविस्तरवाचा :शरद पवारांप्रमाणे बायडेन यांचीही पावसातली सभा अमेरिकेत गेमचेंजर ठरणार का?
- अकोला - केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले नाही, तर 5 नोव्हेंबरपासून केंद्रातील जे मंत्री राज्यामध्ये राहत आहेत त्यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल. बसूनच आंदोलन नव्हे तर त्या मंत्र्यांचे कपडे फाडून आंदोलन करणार आहे. यासोबतच राज्यातील मंत्र्यांचेही आम्ही कपडे फाडणार आहोत. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे किंवा अहवाल चुकीचा पाठवला आहे. त्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचेही कपडे फाडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज सांगितले.