महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एकपर्यंतच्या ठळक बातम्या! - आजच्या मुख्य बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 1 PM : दुपारी एकपर्यंतच्या ठळक बातम्या!

By

Published : Sep 30, 2020, 7:20 AM IST

Updated : Sep 30, 2020, 1:15 PM IST

  • लखनऊ :बाबरी मशीद विध्वंस प्रकरकणी न्यायालयाने आज निकाल जाहीर केला. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला.

सविस्तर वाचा :LIVE : बाबरी मशीद विध्वंस प्रकरण : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

  • मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्यानंतर वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनुराग कश्यप यांना समन्स बजावले असून 1 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा :पायल घोष प्रकरणी अनुराग कश्यप यांना पोलिसांचे समन्स

  • नवी दिल्ली -जिओनंतर रिलायन्स रिटेलची गुंतवणुकीत घौडदौड सुरू झाली आहे. जनरल अटलांटिक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल उद्योगाचा ०.८४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. त्यासाठी जनरल अटलांटिक रिलायन्समध्ये ३ हजार ६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सविस्तर वाचा :रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिक करणार 3,675 कोटी रुपयांची गुंतवणूक

  • मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. निर्भयावेळी केंद्रातील महिला नेत्यांनी जी भूमिका घेतली होती तीच भूमिका आताही घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा :'निर्भयावेळी जी भूमिका केंद्रातील महिला नेत्यांनी घेतली, तीच हाथरस पीडितेसाठी घ्यावी'

  • नवी दिल्ली : गेल्या 24 तासांमध्ये देशात 80 हजार 472 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 62 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.

सविस्तर वाचा :गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार नव्या रुग्णांची नोंद; देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ लाखांवर..

  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जोई बिडेन यांच्या दरम्यान पहिला अध्यक्षीय वाद-विवाद (प्रेसिडेंशिअल डिबेट) आज (बुधवार) पार पडली. केस वेस्टर्न यूनिवर्सिटी, क्लीवलँड (ओहायो ) मध्ये 90 मिनिटे हा वादविवाद (डिबेट) चालला. बोलताना ट्रम्प म्हणाले, की अमेरिकेतील कोरोना मृत्यूंची संख्या ही इतर देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. "आकडेवारीबाबत बोलायचे झाल्यास, तुम्हाला चीन, रशिया आणि भारतात किती लोक मरण पावले आहेत याची कल्पना नाही. हे देश मृतांचे खरे आकडे जाहीर करत नाहीत" असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा :अध्यक्षीय डिबेटमध्ये ट्रम्प यांनी कोरोना बळीं बाबत भारतावर केला खुप मोठा आरोप, म्हणाले....

  • लखनऊ :उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील अत्याचार पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली होती. मंगळवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर सायंकाळी तिचा मृतदेह आपल्या गावी नेण्यात येणार होता. मात्र, तिचा मृतदेह गावी पोहोचण्यास उशीर झाला. मंगळवारी रात्री गावामध्ये तिचा मृतदेह आणण्यात आल्यानंतर, प्रशासनाने लगोलाग तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन टाकले. विशेष म्हणजे, तिचे कुटुंबीय आणि गावकरीही अशा प्रकारे रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यास तयार नव्हते, मात्र गावकऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

सविस्तर वाचा :मरणानंतरही 'तिची' फरपट; वडिलांना घरात बंद करत पोलिसांनी रात्रीच केले घाई-घाईत अंत्यसंस्कार

  • हैदराबाद- आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अध्यक्षपदाचे उमेदवार जोई बिडेन यांच्या दरम्यान पहिला अध्यक्षीय वाद-विवाद (प्रेसिडेंशिअल डिबेट) पार पडला. या डिबेटदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार सुरवात केली. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्या खासगी आयुष्यावर आणि मुलावर वैयक्तिक हल्लेही केले. बिडेन यांनी हुशारीने ते परतवून लावले. उलट बिडेन यांनी ट्रम्प यांच्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये नियमांप्रमाणे कर भरला नसल्याचा मुद्दा उपस्थित करुन चर्चेत रंगत आणली. तसेच ट्रम्प रेसिस्ट असल्याचे म्हणत आरोपांच्या फैरी झाडल्या.

सविस्तर वाचा :युएस निवडणूक 2020: ट्रम्प आणि बिडेन यांच्यात अशी झाली डिबेट

  • कराड (सातारा) - ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याच्या नैराश्यातून दहावीतील विद्यार्थिनीने राहत्या घरातील लाकडी तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कराड तालुक्यातील ओंड गावात घडली आहे. साक्षी आबासाहेब पोळ (वय 15) असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलीचे नाव असून या घटनेची नोेंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

सविस्तर वाचा :धक्कादायक..! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

  • चेन्नई :लहान मुलांचे प्रसिद्ध नियतकालीक 'चांदोबा' (चंदामामा) मधील चित्रकार के. सी. शिवशंकर उर्फ 'चंदामामा शंकर' यांचे मंगळवारी निधन झाले. तामिळनाडूतील तिरुपुरमध्ये आपल्या घरी त्यांनी वयाच्या ९६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

सविस्तर वाचा :प्रसिद्ध चित्रकार 'चंदामामा शंकर' यांचे निधन; वयाच्या ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Last Updated : Sep 30, 2020, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details