- नवी दिल्ली - ओडिशामध्ये अम्फानच्या वादळामुळे धोकादायक वारे वाहू लागले आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये आतापर्यंत 1704 निवारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून 1 लाख 19 हजार 75 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच ओडिशामध्ये भूसख्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
सविस्तर वाचा :'अम्फान' LIVE :180 किमी प्रति तासाच्या वेगाने धडकलं 'अम्फान' महाचक्रीवादळ
- नवी दिल्ली -२५ मे पासून देशांतर्गत प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.
सविस्तर वाचा -२५ मेपासून सुरू होणार देशांतर्गत विमान सेवा; नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती..
- पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाकडून साहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा युजीसी अंतर्गत असते.
सविस्तर वाचा -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा पुढे ढकलली!
- कोल्हापूर - गेल्या ६० दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी डबल पीपीई किट घालून घराबाहेर पडायला पाहिजे. हे सरकार कोरोनाची स्थिती हाताळायला पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज जवळपास दोन महिन्यानंतर ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
सविस्तर वाचा -'डबल पीपीई किट घाला, दिवसातून सहावेळा बदला; पण मातोश्रीतून बाहेर पडा'
- नवी दिल्ली - काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनी आज यूट्यूबवरुन जनतेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सध्या सुरू असलेल्या बसेसच्या मुद्द्याबाबत आपली बाजू मांडली. तसेच, त्यांनी योगी सरकारला या बसेसना परवानगी देण्यासाठी पुन्हा आवाहन केले.
सविस्तर वाचा -हवं तर भाजपचे झेंडे लावा, पण बसेसना राज्यात येऊद्या; प्रियांका गांधींचे योगी सरकारला आवाहन..
- मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे भिशीत गुंतवणूक करणाऱ्या धारावीतल्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांचे कोरोना आणि टाळेबंदीने अनेकांनी रोजगार गमाविले आहेत. आयुष्याची सगळी जमापुंजी दिलेल्या भिशीतील पैशांचे काय होणार, असा प्रश्न गुंतणूकदारांना सतावू लागला आहे.