मुंबई - राज्य शासनाने नुकतीच अनलॉक 4 ची घोषणा केली. मात्र, अद्याप मंदिर उघडण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. सरकारने मंदिर उघण्यासाठी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.
वाचा सविस्तर -...अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिरात प्रवेश करू, राज ठाकरेंचा सरकारला इशारा
मुंबई - सुशांत सिंह प्रकरण सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात सीबीआय आणि अंमली पदार्थ विरोधी पथक चौकशी करत असताना रोज नवीन माहिती समोर येत आहे. यामध्ये ड्रग लिंक्स देखील समोर आल्या आहेत. यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने सिनेसृष्टीतील काही लोकांची चाचणी करण्याची मागणी केली होती. यामध्ये आता माजी खासदार निलेश राणे यांनी फक्त रणवीर आणि रणबीर यांची चाचणी कशाला, 'आदित्य ठाकरेंची देखील चाचणी करावी,' असे म्हटले आहे.
वाचा सविस्तर -'आदित्य ठाकरे यांची देखील ड्रग्ज टेस्ट करा'
दुबई - आयपीएल २०२० स्पर्धेसमोरील अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जचे १३ सदस्य कोरोनाबाधित आढळले. यानंतर आता बीसीसीआयच्या मेडिकल टीममधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. एएनआयने यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, अधिकाऱ्यांनी याची पूष्टी केली आहे. बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार, मेडिकल टीमच्या सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
वाचा सविस्तर -BCCI च्या मेडिकल टीममधील सदस्याला कोरोनाची लागण; IPL अडचणीत?
नंदुरबार - गावात रस्ता नाही. मोठमोठे दगड, दऱ्या, खोरे पार करत, डोंगर चढून प्रवास करावा लागतोय. त्यात कोणी आजारी असेल तर त्याला खांद्यावर नाहीतर 'बांबूलन्स' (बांबूची झोळी)मध्ये नेण्याशिवाय पर्याय नाही. प्रसंगी अनेकांचा जीवही जातो. ही वाईट अवस्था आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम भागातील गावांची...
वाचा सविस्तर -सातपुड्यात रस्तेच नाहीत, अद्यापही 'बांबूलन्स'द्वारे रुग्णांना पोहोचवतात रुग्णालयात
मुंबई -कोरोनाच्या प्रादुर्भावाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन शिक्षणाने झाल्याचे चित्र आहे. मुंबईलगत असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण अजूनही पोहोचले नाही. एकीकडे पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य असल्याने दोन वेळच्या जेवणाची गरज भागवणे कठीण असताना ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असलेली साधने आणायची कुठून, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. परंतु यावर दिगंत स्वराज फाउंडेशन या संस्थेने नामी उपाय शोधलाय. शिक्षण देण्यासाठी त्यांनी 'बोलकी शाळा' नावाचा एक नवीन प्रयोग सुरू केला आहे. काही दिवसांतच ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकही नीट मिळाली नव्हती, त्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या पलीकडे जाऊन शिकण्याची गोडी लावली. आज या प्रयोगाची दखल देशभरात घेतली जात आहे.