महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @7pm : सायंकाळी ७ पर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर... - दिवसभरातील ठळक घडामोडी

सायंकाळी ७ पर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

todays top ten news  top ten news  दिवसभरातील ठळक घडामोडी  आजच्या १० ठळक घडामोडी
Top 10 @7pm : सायंकाळी ७ पर्यंतच्या ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

By

Published : Jun 6, 2020, 6:52 PM IST

शिमला (हिमाचल प्रदेश) - माणसांवर तसेच जनावरांच्या जीवनावर घातक परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या 27 कीटकनाशकांवर बंदी घालण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादनावर परिणाम होणार असल्याची चिंता सध्या शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. तसेच या योजनेनंतर पर्यायी मार्ग शोधण्याची मागणीही शेतकरी करत आहेत.
वाचा सविस्तर -27 कीटकनाशकांवर बंदीची योजना; हिमाचलमधील सफरचंद उत्पादकांना बसणार फटका?

लखनौ - उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधींवर आज टीका केली. सोशल मीडियातून' महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्या' अशी प्रतिमा प्रियंका गांधी यांची बनवली गेली आहे. मात्र, त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या भावाला म्हणजे राहुल गांधींना पण निवडून आणता आले नाही, असा टोला लगावला.

वाचा सविस्तर -आम्ही त्यांचे नाव 'प्रियंका ट्विटर वाड्रा' ठेवलंय...उत्तरप्रदेशाच्या उपमुख्यमंत्र्यांची टीका

नवी दिल्ली- केंद्र सरकार लोकांना रोख रक्कमेची मदत देत नाही. यातून सरकार देशाची अर्थव्यवस्था सक्रियपणे उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. मोदींचे राज्य हे 'राक्षस 2.0' असल्याचीही त्यांनी टीका केली.

वाचा सविस्तर -'सरकारकडून सक्रियपणे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त'

मुंबई - कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, त्याचे खापर सरकारने केंद्र सरकारवर फोडू नये, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ऑनलाईन पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. राज्यातली स्तिथी अतिशय विदारक होत चालली आहे. रुग्णांना बेड मिळणंही मुश्किल झाले आहे. खासगी हॉस्पिटलवर सरकारचा अंकुश राहिला नाही. खासगी हॉस्पिटलमधील बेड केवळ कागदावरच राहिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

वाचा सविस्तर -'कोरोनाच्या लढाईत राज्य सरकार अपयशी, रुग्णांना बेडही मिळेनात'

नाशिक - जिल्ह्यातील देवळा गावाजवळील भावडबारी घाटातील वळणावर ट्रॅक्टर उलटल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील असून या घटनेत पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मालेगाव आणि देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाचा सविस्तर -नाशिकमध्ये भावडबारी घाटात ट्रॅक्टर उलटला; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, पाच जण गंभीर

नवी दिल्ली - जॉन हॉपकीन्स विद्यापीठाच्या कोरोना ट्रॅकरनुसार, भारतात शनिवारी कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३६ हजार ९५४ हजारांवर पोहोचली. या आकडेवारीसह भारताने इटलीलाही मागे टाकले आहे. चिंताजनक बाब म्हणजे, भारत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशांच्या यादीमध्ये ६ व्या स्थानावर पोहोचला आहे.

वाचा सविस्तर -चिंताजनक! कोरोनाच्या आकडेवारीत भारत जगात ६ व्या स्थानावर, इटलीलाही टाकले मागे

लंडन -हाड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध कोरोनाग्रस्त रुग्णांवर कितपत उपयुक्त ठरते यावर इंग्लडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांचा अभ्यास सुरु आहे. अनेक कोरोनाग्रस्तांना हे औषध देण्यात आले होते. मात्र, हाड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना बरा होण्यास मदत करत नसल्यामुळे रुग्णांना औषध देणे थांबविण्यात आले आहे, असे संशोधकांनी सांगितले.

वाचा सविस्तर -मलेरियावरील एचसीक्यू औषध कोरोनावर प्रभावी नाही, ऑक्सफर्डमधील संशोधकांचा दावा


मुंबई - अव्यवहार्य अशा सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 27 महत्त्वपूर्ण कीटकनाशक बंदीचा प्रस्ताव महिनाभरात गुंडाळून ठेवण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. शेतकरी आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रखर विरोधासमोर केंद्र सरकार अखेर नरमले असून नैसर्गिक संकटाने बेजार झालेल्या शेतकर्‍याला कोरोना लॉकडाऊनमुळे फटका बसला असताना आणखी संकटाच्या खाईत जाऊ नये, यासाठी तूर्तास हा प्रस्ताव स्थगित केल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्रालयाने केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

वाचा सविस्तर -२७ कीटकनाशकांच्या बंदीवरील प्रस्तावावर केंद्र सरकारची स्थगिती?

नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयचे मत 3-2 असे विभागले गेले आहे. या मतांमध्ये बहुतेकांना ही लीग भारतातच खेळवण्यात यावी असे वाटत असून गरज भासल्यास ही लीग भारताबाहेर आयोजित करावी असेही काहींनी मत दिले.

वाचा सविस्तर -आयपीएल भारतात की भारताबाहेर?...वाचा बीसीसीआयचे मत

नवी दिल्ली - अभिनेता आयुष्मान खुरानाने 'जोकर'च्या लूकमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आयुष्मानने शेअर केलेला हा फोटो स्वप्नील पवारने त्याच्या आर्टवर्कच्या माध्यमातून तयार केला आहे.

वाचा सविस्तर -आयुष्मानला बनायचंय व्हिलन; इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत व्यक्त केली इच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details