नवी दिल्ली - केरळच्या एर्नाकुलम आणि पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या दोन कारवाईत त्यांनी अल कायदा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, बंदुकी, धारदार शस्त्रे यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा -अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना पश्चिम बंगाल-केरळ मधून अटक, एनआयएची कारवाई
कराड (सातारा) - पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे जवान लेह-लडाख सीमेवर तैनात होते. कित्येक दिवसांनी अवघ्या दोन महिन्यांची रजा त्यांना मिळाली होती. पण, सीमेवर तणाव वाढला आणि महिनाभरातच त्यांची रजा रद्द झाली. तातडीने हजर होण्याचा आदेश आला आणि ते कर्तव्यावर रूजू झाले. अशातच शुक्रवारी सचिन जाधव यांना वीरमरण आल्याची बातमी सकाळी स्थानिक प्रशासनाने दिली. दुसाळे गावच्या सुपूत्राला वीरमरण आले, या बातमीवर ग्रामस्थ आणि सचिनच्या मित्रांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. सीमेवर घुसखोरी करणार्या चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.
सविस्तर वाचा -चीन-भारत संघर्षात साताऱ्याचे जवान सचिन जाधव यांना वीरमरण
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या मुंबईतील पाली हिल स्थित कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने अतिक्रमण संदर्भात कारवाई केली. याच्या विरोधात कंगनाने मुंबई महानगरपालिकेकडे २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिकेतून या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना म्हणण्यात आलं आहे की, कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई योग्य असून तिने दाखल केलेली याचिका ही फेटाळून लावण्यात यावी. कंगनाने मागितलेली नुकसान भरपाई म्हणजे कायद्या सोबत झालेले गैरवर्तन असल्याचेही मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे.
सविस्तर वाचा -कंगनाच्या कार्यालयावरिल कारवाई योग्यच, तिची याचिका रद्द करावी - मुंबई महानगरपालिका
मुंबई - पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सखोल तपास केला जात आहे. या तपासादरम्यान, ईडीने दिल्लीत एक मोठी कारवाई केली आहे. यात ईडीने १०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
सविस्तर वाचा -पीमसी बँक घोटाळ्यात १०० कोटींची संपत्ती जप्त, ईडीची धडक कारवाई
मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास ठराव मांडला आहे. महापौरांविरोधात अविश्वास ठराव भाजपाने मांडल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र पालिकेच्या 128 वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आले. त्यापैकी एकही अविश्वास ठराव मंजूर झालेला नाही. यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव पालिकेतील इतिहासाची पुनरावृत्ती करणार की नवा इतिहास लिहिणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
सविस्तर वाचा -मुंबई महापालिकेत आतापर्यंत 10 महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव, एकही झाला नाही मंजूर