- नवी दिल्ली - अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले.
सविस्तर वाचा-सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय तपास करणार - सर्वोच्च न्यायालय
- नवी दिल्ली - सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णयानंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रियी उमटत आहेत. त्याचा थोडक्यात घेतलेला आढावा.
सविस्तर वाचा-सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरील प्रतिक्रिया
- मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्यावर शरद पवारांनी जाहीर टीका केली होती. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष समोर आला होता. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर लगेचच पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असे सूचक ट्वीट केले आहे.
सविस्तर वाचा-'सत्यमेव जयते'...सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा 'पवार विरुद्ध पवार'?
- पाटणा -सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आनंदी असल्याचे ट्वीट बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केले आहे. हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा लढा आहे. नक्कीच सुशांतला न्याय मिळेल. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्रात गेलेल्या आमच्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी कैद्यासारखं ठेवलं, असा आरोप बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केली.
सविस्तर वाचा-#SushantSinghSuicide : आम्ही बरोबर होतो, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट - पोलीस महासंचालक
- कोल्हापूर - दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी १ वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा नेण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या नियम धाब्यावर बसवून स्टेट बँक चौकातून मोर्चा निघणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
सविस्तर वाचा-'लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'
- अहमदनगर -कोणतेही काम घोळत न ठेवता दादांची थेट निर्णय घेण्याची 'स्टाईल' आपल्याला भावते, असा साक्षात्कार त्यांनी आपल्या ऑफिशियल फेसबुक अकाऊंटवर भेटीचा फोटो टाकत व्यक्त केला आहे. मंगळवारी मुंबईत कार्यालयीन भेट घेत त्यांनी आपले काका असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल आपले जाहीर मत व्यक्त केले आहे.