अनंत सिंह- विवादित वक्तव्ये आणि वादग्रस्त प्रतिमेसाठी परिचित आहेत. यावेळी राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. सिंह यांच्यावर जमीन खटले, अवैध ताबा आणि खून यासारख्या गंभीर बाबींविषयी खटले सुरू आहेत. ते सध्या तुरूंगात आहेत. त्यांच्यावर दोन डझनहून अधिक खटके सुरू आहेत. अनंतसिंह यापूर्वी 'मोकामा'चे आमदारही राहिले आहेत.
रामा किशोर सिंह - ९० च्या दशकापासून अपहरण, धमकावणे, खंडणी यासारख्या गुन्ह्यांमधील आरोपी म्हणून रामा किशोर सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. बिहारच्या राजकारणातील एक कुप्रसिद्ध चेहरा. हाजीपूरला लागून असलेल्या वैशालीच्या महानार भागात दबंग प्रतिमेचे नेते रामा सिंह यांचा नुकताच (राष्ट्रीय जनता दल) आरजेडीत येण्यावरून वाद झाला. राजदचे बलवान नेते रघुवंश प्रसाद यांनी याला विरोध केला होता. आरजेडीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रामा सिंह यांची पत्नी वीणा देवी यांना मनहारमधून उमेदवारी दिली आहे.
आनंद मोहन - डीएम कृष्णैय्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे आनंद मोहन हे बिहारच्या राजकारणातील सर्वात चर्चित नाव आहे. एकेकाळी राजकारणातील अनेक बड्या नेत्यांचे आश्रयदाता असलेले आनंद मोहन आजही चर्चेत आहेत. आधी त्यांची पत्नी जेडीयूमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण शेवटी ते आरजेडीमध्ये दाखल झाले. आनंद मोहन यांची पत्नी लवली आनंद आरजेडीच्या तिकिटावर सुपौल येथून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
अजय सिंह - सीवानच्या दरौंदा मतदारसंघातून अजय सिंह यावेळी निवडणूक लढवणार आहेत. अजय सिंह यांनी यापूर्वी जेडीयूच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली होती. त्यांनी आपल्या पत्नीसाठी जेडीयूकडून तिकीट मागितले होते. गुन्हेगारी प्रतिमेमुळे जेडीयूने तिकीट दिले नाही. त्यामुळे यंदा ते स्वत: अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
अरुण यादव - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चर्चेत आलेल्या आरजेडीचे आमदार अरुण यादव यांची पत्नी किरण देवी आरजेडीच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहेत. अरुण यादव हे भोजपूर जिल्ह्यातून आमदार आहेत.
अमरेंद्र पांडे - अमरेंद्र पांडे ऊर्फ पप्पू पांडे (जेडीयूचे आमदार होते) यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर गोपाळगंज तिहेरी हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपाळगंजच्या कुचायकोटचे आमदार अमरेंद्र पांडे यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यावेळीही ते जेडीयूच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.