महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM :रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..., वाचा एका क्लिकवर - देश विदेशातील महत्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी...

top-10-news
Top 10 @ 11 PM :रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या..., वाचा एका क्लिकवर

By

Published : Oct 16, 2020, 4:10 PM IST

Updated : Oct 16, 2020, 10:37 PM IST

  • नवी दिल्ली -नॅशनल इलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ओडिशातील शोएब अफताब या विद्यार्थ्याने ७२० पैकी ७२० गुण मिळविले आहेत. nta.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

NEET परीक्षेचा निकाल जाहीर, ओडिशाच्या शोएबला पैकीच्या पैकी गुण

  • मुंबई -राज्यात आज (शुक्रवारी) १३ हजार ८८५ जणांनी कोरोनावर मात केली. तर ११ हजार ४४७ नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ११,४४७ नवीन रुग्ण, ३०६ रुग्णांचा मृत्यू

  • मथुरा - श्रीकृष्ण जन्मभूमी जमीन वादावरील याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाने स्वीकारली आहे. २ ऑक्टोबरला मथुरा दिवाणी न्यायालयाने याचिका फेटाळली होती. मात्र, आता जिल्हा न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराजवळील शाही ईदगाह मशीद काढून टाकण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

श्रीकृष्ण जन्मभूमीवरील मशीद हटविण्यासंबंधीची याचिका मथुरा न्यायालयाने स्वीकारली

  • मुंबई - घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून लोकलमध्ये सर्व महिलांना प्रवास करू देण्याची मुभा दिली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अगोदर सांगितले होते की, राज्य सरकारने आम्हाला सूचना दिल्या तर रेल्वे टप्याटप्याने सर्वांसाठी सुरू करू त्याप्रमाणे, राज्य शासनाच्या सुचनेने आता महिलांसाठी लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून लोकलमध्ये महिलांना प्रवास करू देण्याची मुभा

  • नवी दिल्ली -नॅशनल इलिजिबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये ओडिशातील शोएब अफताब या विद्यार्थ्याने ७२० पैकी ७२० गुण मिळविले आहेत. nta.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

NEET परीक्षेचा निकाल जाहीर, ओडिशाच्या शोएबला पैकीच्या पैकी गुण

  • मुंबई - घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून लोकलमध्ये सर्व महिलांना प्रवास करू देण्याची मुभा दिली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अगोदर सांगितले होते की, राज्य सरकारने आम्हाला सूचना दिल्या तर रेल्वे टप्याटप्याने सर्वांसाठी सुरू करू त्याप्रमाणे, राज्य शासनाच्या सुचनेने आता महिलांसाठी लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; उद्यापासून लोकलमध्ये महिलांना प्रवास करू देण्याची मुभा

  • मुंबई- कोरोना विषाणूचा प्रसार काही ठिकाणी कमी-जास्त होत असला तरी त्याची भीती अद्याप गेलेली नाही. कोरोनावर जालीम औषध मिळत नाही तोपर्यंत तोंडावर मास्क लावावा लागणार आहे. मास्क ही सध्या नित्याची बाब झाली असून त्याला अनेकजण कंटाळले आहेत. अशातच नवजात बाळाने डॉक्टरांच्या तोंडावरचा मास्क ओढल्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शुभसंकेत मानायचे का? नवजात बाळानं डॉक्टरांच्या तोंडावरचा मास्क ओढला

  • नवी दिल्ली -केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर पहिल्यांदाच पुत्र चिराग पासवान यांनी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. बिहार निवडणुकीच्या तोंडावर रामविलास पासवान यांचे निधन झाले. त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाची (एलजेपी) सर्व जबाबदारी चिराग पासवानच्या शिरावर येऊन पडली आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली एलजेपी पक्षाने रालोआबरोबरची आघाडी तोडली असून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी ही वडिलांची इच्छा असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले.

बिहार विधानसभा : स्वबळावर निवडणूक लढवावी ही वडिलांची इच्छा - चिराग पासवान

  • नवी दिल्ली -डगमगलेली अर्थव्यवस्था, जीडीपी, कोरोना, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन अशा अनेक मुद्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी पुन्हा एकदा देशातील कोरोना परिस्थितीवरून मोदींवर टीका केली आहे. भारतापेक्षाही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने कोरोना परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे, असे टि्वट त्यांनी केले आहे.

'अफगाणिस्तानने भारतापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे कोरोना परिस्थिती हाताळली'

  • कोलकाता -ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि क्रिकेट समालोचक किशोर भीमानी यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. १९८७मध्ये पाकिस्तानविरुद्ध अहमदाबाद कसोटीत सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या. त्यावेळी भीमानी समालोचन करत होते.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार किशोर भीमानी यांचे निधन

Last Updated : Oct 16, 2020, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details