महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 28, 2020, 7:02 AM IST

Updated : Aug 28, 2020, 11:00 PM IST

ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-10-news
Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

  • मुंबई -राज्यात शुक्रवारी 14 हजार 361 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर, ११ हजार ६०७ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी 331 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा -राज्यात 14 हजार 361 नव्या कोरोना रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या साडेसात लाख

  • मुंबई -मुंबईत मोहरम मिरवणूक काढण्यास उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) परवानगी दिली. मात्र, काही अटींचे पालन करून मिरवणूक काढण्यास परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मिरवणुकीदरम्यान नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सविस्तर वाचा -मुंबईत मोहरम मिरवणुकीस उच्च न्यायालयाची परवानगी

  • मुंबई- राज्यातील जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी जिम मालकांनी मार्गदर्शक तत्वे शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील जिम मालक आणि चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

सविस्तर वाचा -राज्यातील जिम सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक - मुख्यमंत्री

  • श्रीनगर -जम्मू काश्मीरमधील शोपियानमधील किल्लोरा गावात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा सुरक्षा दलाने केला आहे.परिसरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहितीनुसार सुरक्षा दलाकडून शोधमोहिम राबवण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करताच, भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

सविस्तर वाचा -जम्मू-काश्मीर : शोपियान जिल्ह्यात चकमकीत 2 दहशतवादी ठार

  • लातूर-लिंगायत समाजाचे धर्मगुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा कालपासून (गुरुवार) समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. या अफवेमुळे हजारो भक्तांचा जनसमुदाय अहमदपूर येथील भक्ती स्थळासमोर जमा झाला होता. या अफवेमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झाले.

सविस्तर वाचा -डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी घेणार असल्याची अफवा; हजारो भक्त अहमदपूरमध्ये दाखल

  • अहमदनगर -दिल्लीभाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्याला ऑफर दिली असल्याचा खळबळजनक दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. 'दिल्लीत येऊन आम आदमी पक्षाविरोधात एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात करायची असल्याचे गुप्ता यांनी सांगितले असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. अण्णा यांनी गुप्ता यांना एक पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या येण्याने कुठलाही फरक पडणार नाही, असे अण्णा यांनी पत्रात म्हटले आहे.

सविस्तर वाचा -दिल्ली भाजपाची 'ती' ऑफर अण्णांनी धुडकावली

  • नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बिहारमधील निवडणुका थांबवता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने आज बिहार विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याची याचिकेवर सुनावणी केली.

सविस्तर वाचा -बिहार विधानसभा निवडणूका पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

  • वर्धा - जिल्ह्यात सुरू असलेल्या पोखरा प्रकल्पात कामकाज समाधानकारक नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. प्रकल्पाची प्रगती पुढील एक महिन्यात समाधानकारक नसल्यास अधिकार्‍यांवर कारवाईचा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी बैठकीत दिला आहे.

हेही वाचा -पोखरा प्रकल्पाच्या कामावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, कृषी मंत्री दादा भुसेंची माहिती

  • मुंबई : मुंबईच्या लोकलमधून पडल्यामुळे दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला अखेर खरेखुरे दोन्ही हात आज मिळाले आहेत. मोनिकावर आज(शुक्रवार) परळच्या ग्लोबल रुग्णालयात दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करण्यात आले. तब्बल 15 तासांहून अधिक काळ ही शस्त्रक्रिया सुरू होती. एकावेळी दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणाची ही मुंबईतील पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. तर मोनिकाला तिचे दोन्ही हात परत मिळाल्याने ही खूप आनंदाची बाब ठरली आहे.

सविस्तर वाचा -मोनिका मोरेला मिळाले खरेखुरे 'हात', ग्लोबल रुग्णालयात दोन्ही हातांची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

  • मुंबई-सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून तब्बल 5 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात येत आहे. रिया चक्रवर्ती हिला सीबीआयने समन्स दिले होते. आज सकाळी 11 वाजता रिया चक्रवर्ती ही सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली होती. आतापर्यंत तब्बल पाच तासांहून अधिक वेळ रिया चक्रवर्तीची हिची चौकशी करण्यात आलेली आहे. रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी व नीरज सिंग हेसुद्धा सीबीआयच्या पथकासमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. डीआरडीओ कार्यालया बाहेरुन आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी आढावा घेतला आहे.

सविस्तर वाचा -सुशांतसिंह प्रकरण : सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची तब्बल सहा तास चौकशी

Last Updated : Aug 28, 2020, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details