- मुंबई - गणेशोत्सवानंतर राज्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबायला तयार नाही. राज्यात आज २१ हजार ६५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे
सविस्तर वाचा -राज्यात दिवसभरात २१ हजार ६५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४०५ मृत्यू
- नवी मुंबई - तळोजा येथे राहणारा तरुण बेपत्ता असल्याचा बनाव करत पत्नीला सोडून प्रेयसीसोबत पळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्याला कोरोना झाला असून, आपण जगणार नाही असेही त्याने पत्नीला खोटे सांगितल्याचे सत्य समोर आले आहे. मनीष मिश्रा (वय 28) असे या पतीचे नाव असून, तो आपल्या पत्नीला सोडून प्रेयसीसोबत मध्य प्रदेशातील इंदूर येथे पळून गेला होता.
सविस्तर वाचा -कोरोना झाल्याचे पत्नीला खोटे सांगून तरुण प्रेयसीला घेऊन इंदूरला पळाला; नवी मुंबईतील घटना
- नवी दिल्ली -प्रदीर्घ संघर्षाची सुरुवात आता झाली असून, आमचा पक्ष कायमच शेतकऱ्यांसोबत असल्याची प्रतिक्रिया हरसिमरत कौर बादल यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली. मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतीविषयक विधेयकांच्या निषेध व्यक्त करत हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांचे पती शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत गुरुवारी त्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा केली.
सविस्तर वाचा -Interview : आमचा पक्ष शेतकऱ्यांसोबत - हरसिमरत कौर बादल
- मुंबई-मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी उपनगरी मार्गावर मेगा ब्लॉक करणार आहे. पश्चिम रेल्वेकडून शनिवारी रात्री ९ पासून रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० पर्यंत मेगाब्लॉक असेल.
सविस्तर वाचा -रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक
- मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. या जागेवर आज बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार होता. मात्र, आज अचानकपणे तो रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाबद्दल अनेकांना आक्षेप होता सर्वांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हा कार्यक्रम अखेर रद्द झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातील पुतळ्याची पायाभरणी लपून-छपून आणि घाईघाईने करण्याचे कारण काय?, असा सवाल उपस्थित केला आहे.
सविस्तर वाचा -बाबासाहेबांच्या स्मारकातील पायाभरणीचा कार्यक्रम लपून छपून करण्याचे कारण काय?- देवेंद्र फडणवीस
- सातारा - मराठा समाजातील बहुतांश लोकांना खायला अन्न नाही. मुलांची लग्न ठरत नाहीत. किती दिवस नुसती चर्चा, चर्चा अन् चर्चाच करायची. या समाजाबाबत न्याय होत नसेल तर, पदावर राहून तरी काय उपयोग? माझी कोणत्या पक्षाशी बांधिलकी नाही तर, लोकांना मी बांधिल आहे. त्यासाठी राजीनामा द्यायची वेळ आली तर, आता तो देईन, असा उद्वेग खासदार उदयनराजे भोसले यांनी आज व्यक्त केला.