महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - चीन सायबर हल्ला न्यूज

सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

top 10 news at 9 am
Top १० @ ९ AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jun 24, 2020, 8:58 AM IST

मुंबई -अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली आहे... ठाण्यात एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... लडाखच्या गलवान खोऱ्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर भारत-चीन दरम्यान चर्चेतून मार्ग काढला जात असताना आता चीनमधून भारतातील सरकारी आस्थापने, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर व संपर्क क्षेत्रात सायबर हल्ले मागील 4 दिवसात वाढल्याचे समोर आले आहे... बॉलिवूडमधील ख्यातनाम नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली आहे. ही घटना मंगळवारी (23 जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. नवाजीस अहमद ( वय 9 ), दानेश अहमद ( वय 13 ), अरबाज अहमद ( वय 21 ), फैसल अहमद ( वय 18 ) असे मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत.

सविस्तर वाचा -दुर्दैवी..! पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्ख्या भावंडांना जलसमाधी

  • ठाणे -एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण किती मोठे भाई आहोत, हे सिद्ध करण्यासाठी काही गुंडानी एका तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण केली. ही घटना श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मारहाण करणाऱ्या पाच तरुणांपैकी दोन तरुण अल्पवयीन आहेत. त्यांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे.

सविस्तर वाचा -धक्कादायक...! ठाण्यात तरूणाला विवस्त्र करून मारहाण; दोन जणांना अटक

  • मुंबई- लडाखच्या गलवान खोऱ्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर भारत-चीन दरम्यान चर्चेतून मार्ग काढला जात असताना आता चीनमधून भारतातील सरकारी आस्थापने, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर व संपर्क क्षेत्रात सायबर हल्ले मागील 4 दिवसात वाढल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा -चिनी नाही सुधारणार... गेल्या 4 दिवसात भारतात 40 हजारांहून अधिक सायबर हल्ले

  • पुणे(पिंपरी-चिंचवड) -येथील देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका 40 वर्षीय सावत्र बापानेच 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

सविस्तर वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

  • मुंबई - बॉलिवूडमधील ख्यातनाम नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सरोज यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. तर उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याने लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा -बॉलिवूडमधील ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

  • लखनऊ : कोरोना महामारीच्या काळात देशातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. अगदी लखनऊचे सहाय्यक पोलीस उपायुक्तही यातून सुटले नाहीत, हे विशेष!

सविस्तर वाचा -जागते रहो : तुम्हीही ठरू शकता 'आयडेंटिटी क्लोनिंग'चे बळी..

  • हरिद्वार (उत्तराखंड) -योग गुरू रामदेव बाबा यांच्या पंतजली या संस्थेने कोरोनावर उपाय म्हणून 'कोरोनिल' औषधाची निर्मिती केली आहे. मात्र, केंद्रिय आयुष मंत्रालयाने यावर औषधीच्या प्रचार आणि प्रसारावर बंदी आणली आहे. यानंतर पतंजलीने केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या सर्व शंका दूर करण्याचा दावा केला आहे.

सविस्तर वाचा -पतंजलीने 'कोरोनिल'बाबत सर्व पुरावे आयुष मंत्रालयाला पाठवले

  • मुंबई - राज्यपाल नियुक्त विधान परिषद जागांसाठी राजकीय पक्षाकडून नक्की कोणत्या 12 जणांना संधी मिळणार यांची उत्सुकता कायम आहे. यात दररोज नवनवीन नावांची भर पडते आहे. याच जागेसाठी मराठी नाट्यकर्मीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रसाद कांबळी यांचा नावाची शिफारस केली आहे.

सविस्तर वाचा -राज्यपाल नियुक्त विधान परिषद जागेसाठी नाट्यकर्मींकडून प्रसाद कांबळी यांच्या नावाची शिफारस

  • अमरावती- बापानं मिळेल ते काम करायचं, मजुरीच्या कामातून दिवसाला शंभर, दोनशे रुपये मिळायचे. मात्र, या कष्टात आनंद मिळायचा तो मुलं शिकताहेत याचा. आज मात्र या आनंदानं आकाश गाठलं. मुलगी चक्क नायब तहसीलदार झाली. आजवर केलेले कष्ट सार्थकी लागले आणि आता आपलं आयुष्य पालटेल असा विश्वास अकोली परिसरात राहणाऱ्या सुरेश बारसे यांच्यात निर्माण झाला. प्राजक्ता या मुलीनं कष्टाचं चीज केलं. वडिलांसोबतच आई, भाऊ, मामा आणि शेजारचे सारेच भारावून गेलेत.

सविस्तर वाचा -ईटीव्ही भारत विशेष; टिनाचं घर, मजुरी करणारा बाप, मुलगी झाली नायब तहसीलदार . . .

  • यवतमाळ- जूनच्या सुरवातीला परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे 18 जूनपर्यंत उमरखेड तालुक्यातील मुळावा परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी अटोपली. परंतु मुळावा व परिसरातील अधिकतर शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. परिसरातील शेतकरी अनिल बरडे यांच्या शेतातील दहा एकर सोयाबीनची उगवण न झाल्यामुळे त्यांनी शेतात ट्रॅक्टर फिरवला आहे.

सविस्तर वाचा -दहा एकर शेतात पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्याने फिरवला नांगर, आता दुबार पेरणीचे संकट

ABOUT THE AUTHOR

...view details