मुंबई -चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली. मोदींच्या या वक्तव्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने मागितले आहे... राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शहरात ग्राहक बनून एका दुकानात स्टिंग ऑपरेशन केले... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर, बकनर यांनी सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मान्य केले आहे... भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे, हे एकसारखे असल्याचे, ऑस्ट्रेलियाचा सलामीवर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली - चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली. मोदींच्या या वक्तव्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने मागितले आहे. चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली नाही, हे मोदींचे वक्तव्य चीनचीच भूमिका उचलून धरत नाही का? असा सवाल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे.
सविस्तर वाचा -'सीमावादावर पंतप्रधान मोदी चीनची भूमिका उचलून धरताहेत'
- औरंगाबाद - राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शहरात ग्राहक बनून एका दुकानात स्टिंग ऑपरेशन केले. शेतकरी बनून गेलेल्या भुसे यांनी दुकानदाराला युरियाची मागणी केली. मात्र, दुकानदाराने उपलब्ध असुनही युरिया नसल्याचे सांगितले. यानंतर भुसेंनी दुकानदारावर कारवाई करत गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. राज्यभरातील कृषी दुकानदारांनी शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचीच खते, बियाणे घेण्याची सक्ती करू नये, शिल्लक असतानाही युरिया शेतकऱ्यांना न देणे या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे.
सविस्तर वाचा -VIDEO : 'नायक' स्टाईल रेड.. चक्क राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच शेतकऱ्याच्या वेशात जाऊन केले स्टिंग ऑपरेशन
- मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने खोऱ्याने धावा जमवल्या, पण त्याला अनेकदा पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा त्याला शिकार व्हावे लागले आहे. सामन्यातील अगदी महत्त्वाच्या क्षणी सचिनला अनेकदा वादग्रस्तरीत्या बाद दिले गेल्याच्या घटना क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताज्या असतील. सचिनला अशाप्रकारे बाद देणाऱ्या पंचांमध्ये स्टिव्ह बकनर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर, बकनर यांनी सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मान्य केले आहे.
सविस्तर वाचा -होय..! मी दोन वेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिले - स्टिव्ह बकनर
- मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचणे आणि अस्वलासोबत पंगा घेणे, हे एकसारखे असल्याचे, ऑस्ट्रेलियाचा सलामीवर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे. वॉर्नरला कोहलीच्या फलंदाजीची भीती वाटते. त्यामुळेच त्याने बहुतेक हे मत व्यक्त केले असणार आहे.
सविस्तर वाचा -वॉर्नर म्हणतो... विराटला डिवचणे म्हणजे अस्वलाशी पंगा घेण्यासारखे
- रत्नागिरी- मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना रत्नागिरीतल्या जयगडमध्ये घडली आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या तरुणाचे शोधकार्य सुरू आहे. विरांची विलास खापले (18, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.