मुंबई - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जवानानी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.... सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा धक्का पचवू न शकल्याने तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे त्याच्या चाहत्याने गळफास लावून आत्महत्या केली... अकरावी प्रवेशाच्या शासन निर्णयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच केले जावेत अन्यथा याविरोधात आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा 'सिस्कॉम' संस्थेने दिला आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. अद्याप शोधमोहिम सुरू आहे.
सविस्तर वाचा -काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्याला कंठस्नान
- मुंबई -नरिमन पॉईंट येथील जॉली मेकर चेंबर 2 इमारती मधील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या सर्व्हर रूमला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीवर सकाळी 7 वाजता अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले आहे.
सविस्तर वाचा -नरिमन पॉईंट येथील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या 'सर्व्हर रुम'ला आग, आग नियंत्रणात
- मुंबई- येथील अंधेरी पूर्व मरोळ उद्योग सोसायटी मधील नंदन इंडस्ट्रीयल इस्टेट येथे रात्री 12 वाजून 49 मिनिटाला आग लागली होती. या आगीत दोन गाळे जळून खाक झाले आहेत. या आगीवर पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले.
सविस्तर वाचा -अंधेरी मरोळ येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग, दोन गाळे जळून खाक, एक अधिकारी जखमी
- मुंबई- राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शासन निर्णय काल सरकारने जारी केला. त्या निर्णयात गुणवत्तेनुसार प्रवेश देणे, या प्रक्रियेला हरताळ फासला जाणार आहे. यामुळे अकरावीचे प्रवेश हे 26 मार्च 1997 आणि 2003 मध्ये घेण्यात आलेल्या अकरावी प्रवेशाच्या शासन निर्णयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरच केले जावेत अन्यथा याविरोधात आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल, असा इशारा 'सिस्कॉम' संस्थेने दिला आहे.
- पुणे - जगासमोर शिक्षण प्रणाली कार्यपद्धतीचा यशस्वी प्रयोग पुण्याच्या वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेने ठेवला आहे. त्यामुळे वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे जगाने कौतुक केले आहे. त्यातच सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आल्याने वाबळेवाडी शाळेच्या वारे गुरुजींच्या संकल्पनेतून 'ग्रुप होम स्कूलिंग'चा यशस्वी प्रयोग समोर आला. यात विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका बजावत आहेत.