महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - जवान-दहशतवादी चकमक न्यूज

सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

top-10-news-at-11-am
Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jun 23, 2020, 11:03 AM IST

मुंबई -सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर पुरी येथील जगन्नाथ रथ यात्रेला सुरूवात झाली आहे... जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बांदजू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत जवांनानी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एक जवानाला या चकमकीत वीरमरण आले... मुंबईच्या पूर्व उपनगरातील मानखुर्द मंडाळा येथील एका भंगाराच्या दुकानाला आग लागली आहे... केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १४ हजार ९३३ रुग्ण आढळले... दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...

  • भुवनेश्वर (ओडीशा) -सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पुरी येथील जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यासाठी येथील प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या आहे. मात्र, दरवर्षी भक्तांचा जसा मोठा जनसागर या ठिकाणी असतो, तसा जन समुदाय यंदा नाही. भक्तांना पुरीला येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनी घरीच राहून दर्शन करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा -ओडीशा: पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, भक्तांना घरीतूनच घ्यावे लागणार दर्शन

  • मुंबई- मुंबई- मुंबईच्या पूर्व उपनगरातील मानखुर्द मंडाळा येथील एका भंगाराच्या दुकानाला आग लागली आहे. आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा -मानखूर्द-घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला येथे भंगार गोदामाला मोठी आग

  • पुलवामा -जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बांदजू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. एक जवानाला या चकमकीत वीरमरण आले आहे. दरम्यान, या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.

सविस्तर वाचा -J-K : पुलवामा चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवानाला वीरमरण

  • नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १४ हजार ९३३ रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांसह देशभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार २१५ वर पोहोचली आहे.

सविस्तर वाचा - देशात २४ तासांत १४ हजार ९३३ नवे रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू

  • जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुन घेतली होती. या चाचणीत ७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. ही माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक फॉल यांनी दिली.

सविस्तर वाचा -दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डात कोरोनाचा शिरकाव; ७ जणांना लागण

  • हैदराबाद - इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघातील 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. हैदर अली, हारीस रौफ आणि शादाब खान अशी या 3 खेळाडूंची नावे आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली.

सविस्तर वाचा -पाकिस्तानला धक्का...! इंग्लंड दौऱ्याआधी 'या' 3 खेळाडूंना कोरोनाची लागण

  • नांदेड - संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पांगरी (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्यांच्या केळी बांधावरून थेट इराणला निर्यात करण्यासाठी पहिली गाडी रवाना झाली. हा माल मुंबईतील बंदरावरून जहाजाद्वारे पाठविण्यात येणार आहे. केळी सातासमुद्रापार जाण्याच्या वाटा खुल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.

सविस्तर वाचा -नांदेडची केळी सातासमुद्रापार, जिल्ह्यातून पहिल्यांदा इराणला होतेय निर्यात

  • सोलापूर - मागील ऊस गळीत हंगामात लोकमंगल कारखान्याला दिलेल्या उसाचे पैसे न मिळाल्याने लगतच्या कर्नाटकातील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. 22 जून) लोकमंगल कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

सविस्तर वाचा -थकीत ऊसबिलासाठी कर्नाटकातील शेतकऱ्यांचे 'लोकमंगल'समोर ठिय्या आंदोलन

  • मुंबई- शहरातील रुग्ण दुप्पटीचा कालावधी आता ३६ दिवसांवर पोहोचला असून वरळी, धारावी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यासारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. रुग्णालयातील बेड, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, कोरोना उपचार केंद्र या सर्व सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, नागरिक यांचे सहकार्य लाभत आहे. याच वेगाने आपण सर्व मिळून कोरोना विरुद्ध लढत राहिलो, तर जुलै मध्यापर्यंत कोविड संसर्गाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली असेल असा विश्वास महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा -जुलै मध्यापर्यंत कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न - महापालिका आयुक्त

  • कोल्हापूर - जे राजीनामा नाट्य झाले, ते नियोजित होते. मला मिळणारे मंत्रिपद वरिष्ठ नेत्यांमुळे मिळाले नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भूयार यांनी केला होता. या विषयी राजू शेट्टी यांनी देवेंद्र भूयार हे नवीन आहेत. ते नवखे आहेत. त्यांचा ही गैरसमज लवकरच दूर होईल. ते माझेच कार्यकर्ते आहेत. त्यांना निवडून आम्हीच आणले आहेत, आम्हीच त्यांना समजावून सांगू असे शेट्टी म्हणाले.

सविस्तर वाचा -देवेंद्र भूयार नवखे आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू

ABOUT THE AUTHOR

...view details