मुंबई -मागील १६ दिवसापासून सुरू असलेली पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ कायम असून आज सोमवारी दिल्लीत पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल ५८ पैशांनी वाढले... भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरांतावर टीका केली होती. त्यानंतर थोरातांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या वाक् युद्धानंतर आता शिवसेनेने मुखपत्र सामनातून राधाकृष्ण विखेंचा चांगलाच समाचार घेतला आहे... जालन्यात वीज महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला असून वीज जोडणी नसताना शेतकऱ्याला ३० हजाराचे बिल पाठवले आहे... देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या नव्या रुग्णांनी 14 हजारांचा आकडा पार केला, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
नवी दिल्ली - मागील १६ दिवसांपासून सुरू असलेली पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ कायम आहे. आज सोमवारी दिल्लीत पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल ५८ पैशांनी वाढले. वाढीव दरानुसार, दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर ७९.५६ रुपये तर डिझेल ७८.८५ रुपयांनी विकले जात आहे.
सविस्तर वाचा -सलग १६ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम; एक लीटरसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये
- मुंबई- भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरांतावर टीका केली होती. त्यानंतर थोरातांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या वाक् युद्धानंतर आता शिवसेनेने मुखपत्र सामनातून राधाकृष्ण विखेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. सत्तेत नसलेल्या विखेंची माशाप्रमाणे अवस्था झाली आहे. त्यातून त्यांना जे वैफल्य आले आहे, त्यामुळेच भाजपमध्ये जाऊन काहीच फायदा न झाल्याची जी चिड आहे, त्या चिडीतूनच ते टाळूवरचे केस उपटत असतील, अशी बोचरी टीका केली आहे.
सविस्तर वाचा -टुरटुर सुरुच..! 'वैफल्यग्रस्त विखे 'त्या' चिडीतूनच टाळूवरचे केस उपटत असतील'
- जालना- वीज महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 2011 मध्ये अंबड तालुक्यातील एका महिला शेतकऱ्याने नियमानुसार, कोटेशन भरून शेतीसाठी विजेची मागणी केली होती. वीज जोडणी तर आत्तापर्यंत मिळालीच नाही, पण महावितरणाने तीस हजारांचे बिल मात्र त्या महिला शेतकरीला पाठवले आहे. महावितरणाचे बिल पाहून त्या महिला शेतकरीला धक्काच बसला.
सविस्तर वाचा -'महावितरण'चा भोंगळ कारभार..! शेतात वीज जोडणीच नाही, तरीही पाठवले ३० हजारांचे बिल
- राजगड (मध्यप्रदेश)- राजगड जिल्ह्याच्या सारंगपूर शहराजवळ गोपालपुरा बायपासवर दोन चारचाकी वाहनांमध्ये समोरा-समोर धडक होऊन एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले आहेत.
सविस्तर वाचा -मध्यप्रदेशात चारचाकींची समोरासमोर धडक, ५ जण ठार
- नवी दिल्ली - देशात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या नव्या रुग्णांनी 14 हजारांचा आकडा पार केला. यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या 4 लाखांच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 14 हजार 821 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 445 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.