महाराष्ट्र

maharashtra

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

By

Published : Jul 21, 2020, 8:58 AM IST

Updated : Jul 21, 2020, 1:06 PM IST

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

todays-top-ten-news-at-1-pm
दुपारी एक वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारने दूध दर आणि इतर मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढचा संग्राम मोठा असेल. यापुढे संघटना कोणता इशारा न देता थेट रस्त्यावर उतरेल. त्यावेळी कोणता सोशल डिस्टन्स पाळणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थेची बुज राखणार नाही.

वाचा सविस्तर -...तर कायदा व सुव्यवस्थेची बुज राखणार नाही; राजू शेट्टींचा केंद्र व राज्य सरकारला इशारा

गुवाहटी (आसाम) -राज्यात पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. आतापर्यंत पुरात 85 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 24 जिल्ह्यातील 2 हजार 325 गावांत पुरामुळे नुकसान झाले आहे. तर एकूण 24 लाख, 48 हजार, 128 जणांना याचा फटका बसला आहे.

वाचा सविस्तर -आसाममध्ये पुराचे थैमान; आतापर्यंत तब्बल 85 जणांचा मृत्यू

लातूर - जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील मध्यम प्रकल्पात मासेमारीसाठी गेलेल्या आंधोरी गावातील पितापुत्राचा बुडून मृत्यू झाला आहे.

वाचा सविस्तर -मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्राचा बुडून मृत्यू ; अहमदपूर तालुक्यातील घटना

पूर्णिया(बायसी) -बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातील बायसी तालुक्यातील गवालगांवमध्ये घरगुती सिलिंडरच्या स्फोटात 5 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 4 मुलांचा मृत्यू हा रुग्णालायत उपचारादरम्यान झाला असून एकाचा मृत्यू घटनास्थळावर झाला.

वाचा सविस्तर -बिहारमध्ये घरगुती सिलिंडरचा स्फोट, एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांचा मृत्यू

जळगाव -जिल्ह्यातील पाचोरा शहरातील साईमोक्ष क्वारंटाइन सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या क्वारंटाइन सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका 33 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली असून, मंगळवारी सकाळी उजेडात आली.

वाचा सविस्तर -जळगावात क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेऊन कोरोना संशयित तरुणाची आत्महत्या

धनबाद (झारखंड) - लग्नसमारंभात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेसह तिच्या पाच मुलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकानंतर एक अशी एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना धनबादच्या बाघमारा येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. तर लोकांमध्ये भयाचे वातावरण आहे.

वाचा सविस्तर -धक्कादायक...! लग्नात गेलेल्या महिलेसह तिच्या 5 मुलांचा कोरोनाने मृत्यू

नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील कोरोना रुग्ण वाढीवरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी कोरोना संसंर्ग काळात मोदी सरकारने वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष करुन राजकारणावर लक्ष केंद्रीत केल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे.

वाचा सविस्तर -राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर ट्विटास्त्र, कोरोना काळात सरकारने मिळवले 'हे' यश

नवी दिल्ली -गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 37 हजार 148 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गंभिर बाब म्हणजे एकाच दिवसात 587 जणांना जीव गमावावा लागला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 11 लाख 55 हजार 191 झालू आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 2 हजार 529 आहे तर समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत 7 लाख 24 हजार 578 कोरोाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत.

वाचा सविस्तर -देशभरात आढळले 37 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्येने गाठला 11 लाखांचा टप्पा

सांगली - दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची सुरुवात सांगलीमध्ये आक्रमक पद्धतीने झाली. दुधाचा टँकर फोडून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आले. इस्लामपूरच्या पेठे येथे पुणे-बंगळुरू हायवेवर पहाटेच्या सुमारास स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने आंदोलन करत दूध दर वाढीची मागणी केली.

वाचा सविस्तर -आंदोलनाचा भडका, सांगलीत दुधाचा टँकर फोडून हजारो लीटर दूध स्वाभिमानीने रस्त्यावर सोडले

लखनऊ (उत्तर प्रदेश) -मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. लखनऊच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

वाचा सविस्तर -मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन; लखनऊच्या मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Last Updated : Jul 21, 2020, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details