महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अबब..! ७ वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात - ७ year old boy

'ही शस्त्रक्रिया २ तास चालली. एकाच व्यक्तीच्या तोंडात इतके दात सापडण्याची ही वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील पहिलीच घटना आहे,' असेही डॉ. सेंतिलनाथन यांनी सांगितले.

तब्बल ५२६ दात

By

Published : Jul 31, 2019, 8:56 PM IST

चेन्नई -डॉक्टरांनी एका ७ वर्षांच्या मुलाच्या तोंडातून शस्त्रक्रिया करून तब्बल ५२६ दात बाहेर काढले आहेत. रविंद्रन असे या मुलाचे नाव आहे. सविता दंतवैद्यकीय महाविद्यालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या तोंडात आश्चर्यकारकरीत्या ५२६ दात आले होते. यामुळे त्या मुलाचा खालचा जबडा सुजला होता. त्याला 'कंपाऊंड कॉम्पोझिट अॅडोन्टोमा' हा अत्यंत दुर्मीळ आजार झाला होता.

रविंद्रन आई-वडिलांसह
७ वर्षांच्या चिमुरड्याच्या तोंडातून काढले तब्बल ५२६ दात

रविंद्रन याच्यावर ११ जुलैला ही शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर त्याला ३ दिवस रुग्णालयात रहावे लागले. डॉ. सेंतिलनाथन यांनी या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. 'रविंद्रन याला रुग्णालयात आणले तेव्हा त्याचा खालचा जबडा सुजला होता. त्याचे सीटी स्कॅन आणि रेडिओग्राफ केल्यानंतर त्याच्या जबड्यात अनेक कठीण वस्तू असल्याने त्याच्या जबड्याला मोठी दुखापत झाल्याचे निदर्शनास आले होते. आम्हाला हा ट्युमर असल्यासारखे वाटले. आम्ही त्याची बायॉप्सी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याच्या जबड्याची पुनर्रचना करावी किंवा या ट्युमरवर उपचार करून जबडा वाचवावा, असा विचार केला होता. अखेर आम्ही यातील दुसऱ्या प्रकाराचा अवलंब केला आणि यामध्ये जबड्याला दुखापत झाल्यास त्याची पुनर्रचना करावी, असे ठरवले. मात्र, प्रत्यक्षात ज्याला ट्युमर किंवा गाठ समजले जात होते, त्या भागातून ५२६ छोटे-छोटे दात बाहेर काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया २ तास चालली. एकाच व्यक्तीच्या तोंडात इतके दात सापडण्याची ही वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील पहिलीच घटना आहे,' असेही डॉ. सेंतिलनाथन यांनी सांगितले. सर्वसाधारण भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. सेंतिलनाथन

ABOUT THE AUTHOR

...view details