तिरुमला- भारतातील प्रमुख मोठ्या देवस्थानांपैकी एक असलेले बालाजी मंदिर पुन्हा भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. मागील ७० दिवसाहून अधिक काळानंतर हे मंदिर भक्तासाठी खुले करण्यात आले आहे. पण भक्तांना दर्शनासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहेत.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बालाजी मंदिर खुले करण्यात आले आहे. यात वृद्ध आणि लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिरात जास्त गर्दी होऊ नये म्हणून, मोजक्याच भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
तिरुपती देवस्थानम मंदिर, बंगळुरुचे सचिव के. टी. रामाराजू यांनी सांगितले की, मंदिरात प्रवेश देताना भक्तांना सॅनिटायझर दिले जाईल. तसेच त्यांच्या शरीराचे तापमान तपासूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.'