पटना -बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यात 'टाईम बॉम्ब' सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यंमत्री नितीश कुमार जल जीवन हरियाली अभियानांतर्गत आयोजित यात्रेसाठी सकाळी मोतिहारी जिल्ह्यामध्ये असताना हा बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे पोलीस विभागाने युद्धपातळीवर या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यात टाईम बॉम्ब सापडल्यानं खळबळ
बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यात 'टाईम बॉम्ब' सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यंमत्री नितीश कुमार जल जीवन हरियाली अभियानांतर्गत आयोजित यात्रेसाठी सकाळी मोतिहारी जिल्ह्यामध्ये असताना हा बॉम्ब सापडला आहे.
जिल्ह्यातील कोटवा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मदर डेअरीजवळील रस्त्यावर बॉम्ब सापडला. त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे. बॉम्ब स्कॉडने हा बॉम्ब निकामी केला.
मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये आज अनेक विकास कामांचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री सीवान जिल्ह्यामध्ये गेले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्वचिन्ह उपस्थित होत आहे.