नवी दिल्ली - भारत - चीन सीमेवरील झटापटीत तीन जणांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका भारतीय अधिकाऱ्यासह दोन जवानांचा समावेश आहे. गलवान व्हॅलीत काल रात्री ही चकमक झाली. दोन्ही देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू असतानाच ही झटापटीत झाल्याची माहिती मिळत आहे.
भारत-चीन सीमेवरील झटापटीत तिघांना वीरमरण - गलवान व्हॅली
भारत-चीन सीमेवरील झटापटीत तीन जणांना वीरमरण आले आहे. यामध्ये एका भारतीय अधिकाऱ्यासह दोन जवानांचा समावेश आहे.
चीनने सीमेजवळ 10 हजारांहून अधिक तुकड्या आणल्यानंतर भारतानेही तेवढेच सैन्य तैनात केले होते. गेल्या महिन्यात चीनचे सैनिक हे भारतीय सैनिकांच्या समोर येऊन उभे ठाकले होते. यावेळी चिनी सैन्याकडे लढाऊ आणि जड वाहने होती. त्यानंतर दहा दिवसांत दोन्ही देशांच्या मेजर जनरल व ब्रिगेड पातळीवर चर्चा झाली.
चीनने लढाऊ विमाने आणि बॉम्ब वर्षाव करणारे विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक असलेल्या होटन व गार गुनासाच्या धावपट्टीवर तैनात केले होते. सामान्य स्थितीत अशी सैनिकांची जुळवाजुळव करण्यात येत नाही.