रायुपूर -अंधश्रध्देचे विविध प्रकार ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. छत्तीसगडमधील जशपूर येथे वीज कोसळून जखमी झालेल्या तिघांना शेणाने झाकल्याची घटना घडली. वेळेवर उपचार न मिळाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
सुनील साय, राजू तिर्की आणि चंपा राऊत हे तीन जण वीज कोसळल्याने गंभीर जखमी झाले होते. गावकऱ्यांनी प्रथमोपचाराच्या नावाखाली सर्व जखमींना शेणाने झाकले. शेणाने विजेचा प्रभाव कमी होतो, असा ग्रामस्थांचा विश्वास आहे.
जखमींच्या स्थितीत बराच काळ सुधारणा न झाल्याने त्यांना रायगडच्या लेलुंगा रुग्णालायत दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टांनी दोघाला मृत घोषित केले आहे. तर एकावर उपचार सुरू आहे. सुनील साय आणि चंपा राऊत या दोघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान छत्तीसगडमध्ये वादळी पावसात वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वीज कोसळल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. हा तरुण पुसौर ब्लॉकमधील कंसारा गावचा रहिवासी होता. तो आपल्या शेतात पीक पाहण्यासाठी गेला होता.