महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 29, 2020, 1:23 PM IST

ETV Bharat / bharat

व्हाॅट्सअॅपचा संशयास्पद वापर; पोलिसांकडून सैन्यातील तीन हमाल ताब्यात

पोलीस सूत्राच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी हे पूंछ जिल्ह्यातील आहेत. ते सैन्यदलाकरता पूंछ जिल्ह्यातील भिंबर गली क्षेत्रात हमाल म्हणून काम करत होते.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

जम्मू (जम्मू आणि काश्मीर) – भारताच्या सीमारेषेवर तणावाची स्थिती असताना सैन्यदल अधिक सतर्क झाले आहे. जम्मूमध्ये सैन्यदलाकरता काम करणाऱ्या तीन स्थानिक हमालांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे हमाल संशयास्पद पद्धतीने व्हाॅट्सअॅपचा वापर करत होते.

पोलीस सूत्राच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी हे पूंछ जिल्ह्यातील आहेत. ते सैन्यदलाकरता पूंछ जिल्ह्यातील भिंबर गली क्षेत्रात हमाल म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे देखरेख करत असताना तिन्ही व्यक्ती व्हाॅट्सअॅपचा वापर संशयास्पद पद्धतीने करताना सैन्यदलाला आढळून आले.

त्यांचा व्हाॅट्सअॅपचा वापर हा अत्यंत संवेदनशील प्रकार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यांचे मोबाईल क्रमांक हे काही ग्रुपमध्ये दिसत होते. या प्रकाराने संशय वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, अद्याप काही विसंगत आढळले नसल्याचे सूत्राने सांगितले.

दरम्यान, सैन्यदलाच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाया सुरू आहेत. तर दुसरीकडे नेपाळ आणि चीन सीमेलगत तणावाची स्थिती असल्यानेे सैन्यदलाला अधिक सतर्कतेेने परिस्थितीला तोंड द्याव लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details