महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणामधील अंबाला एअरबेसला बॉम्बने उडवण्याची धमकी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ - हरियाणा

हरियाणामधील अंबाला एअरबेस उडवण्याचे पत्र आज अंबाला एअरबेस फोर्सला मिळाले असून बेसवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, अंबाला एअरबेसवर फ्रान्समधून भारतात आलेली राफेल विमाने असल्याने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

हरियाणा
हरियाणा

By

Published : Aug 22, 2020, 5:17 PM IST

अंबाला - हरियाणामधील अंबाला एअरबेस उडवण्याचे पत्र आज अंबाला एअरबेस फोर्सला मिळाले असून बेसवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 15, 17, 21, 25 आणि 29 ऑगस्ट दरम्यान बॉम्बने दिल्ली, अयोध्या, अंबाला एअरबेस आणि पंजाबला उडवण्याबाबतची माहिती देणारे पत्र अंबाला एअरबेस अधिकाऱयांना मिळाले आहे. या कटामध्ये तब्बल 15 जणांचा समावेश असून यामध्ये मुख्य सुत्रधार जालंधर रामामंडी येथील निवासी राजेश वैश्य यांना म्हटलं आहे. तसेच पत्रात मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. मात्र, संपर्क साधला असता संबधित मोबाईल क्रमांक बंद असल्याचे समोर आले आहे. हे पत्र एक षडयंत्रही असू शकते, अशी शंका एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

हरियाणामधील अंबाला एअरबेसला बॉम्बने उडवण्याची धमकी

याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधिंनी अंबाला पोलीस अधिक्षक अभिषेक जोरवाल यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याप्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान यावर अंबाला छावनीचे डीएसपी रामकुमार यांनी माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे. कदाचीत हे पत्र फेक असावे, याबाबत शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अंबाला एअरबेसवर फ्रान्समधून भारतात आलेली राफेल विमाने असल्याने सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

काय प्रकरण ?

दिल्ली, अयोध्या, अंबाला एअरबेस आणि पंजाबला बॉम्बने उडवण्यात येणार आहे, या आशयाचे पत्र अंबाला एअरबेस फोर्सला मिळाले आहे. यामध्ये लष्करातील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बबलू कुमार, जय, मनीष ही तीन जणे लष्करातील असून या कटात सामिल आहेत. हल्ल्यांसाठी पाकिस्तानामधून 25 करोड रुपये आले आहेत. कृपया हे पत्र गांभीर्याने घ्यावे आणि आरोपींना पकडावे, नाही तर ते सर्व ठिकाणी बॉम्ब लावतील, असे पत्रात म्हटलं आहे. पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख मोनिका जासूस सांगितली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details