महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी घेणार सोशल संन्यास.. रविवारनंतर फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अन् यूट्यूबला रामराम.. - सोशल मीडिया मोदी

रविवारपर्यंत आपण आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट बंद करत असल्याचा विचार करत आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली आहे.

This Sunday, thinking of giving up my social media accounts tweets PM Modi
पंतप्रधान मोदी घेणार सोशल संन्यास.. रविवारपर्यंत फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अन् यूट्यूबला रामराम..

By

Published : Mar 2, 2020, 9:48 PM IST

Updated : Mar 2, 2020, 10:02 PM IST

नवी दिल्ली -रविवारपर्यंत आपण आपले सर्व सोशल मीडिया अकाउंट बंद करत असल्याचा विचार करत आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे, रविवारनंतर कदाचित त्यांचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट बंद होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामध्ये त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अन् यूट्यूब अकाऊंटचा समावेश आहे.

याबाबत आपण माहिती देत राहणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

सोशल मीडिया नाही, तर द्वेष सोडा..

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी मोदींच्या ट्विटला रिट्विट करत, त्यावर 'सोशल मीडिया नव्हे, तर द्वेष सोडा' असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. या ट्विटनंतर मोदींना हा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यासाठी सुरू झालेला 'नो सर' हा हॅशटॅग सध्या चार नंबरला ट्रेंडिंग आहे.

हेही वाचा :सामूहिक अत्याचारप्रकरणी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा!

Last Updated : Mar 2, 2020, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details