जिनिव्हा- जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवल्या जाणारा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यावर संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना विषाणू विरोधातील लढाईत जागतिक आरोग्य संघटना किंवा इतर कोणत्याही मानवतावादी संघटनेला पुरवले जाणारे संसाधन कमी करण्याची ही वेळ नाही. कारण, ह्या संस्था कोरोनाविरोधात लढा देत आहेत, असे गुटेरेस म्हणाले.
ट्रम्प यांनी रोखला 'डब्ल्यूएचओ'चा निधी, यूएनचे सरचिटणीस म्हणाले...'ही योग्य वेळ नाही' - डोनाल्ड ट्रम्प
मागील काळात वळून पाहण्याची वेळ नसून या संकटातून मुक्त होण्यासाठी सर्व लोकांनी काय करावे याचा विचार करण्याची गरज नाही. हा एकजुटीचा असून विषाणूचे भयानक परिणाम थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवला जाणार निधी रोखण्याचे निर्देश प्रशासनला दिले आहेत. कोरोनाच्या उद्रेकात डब्ल्यूएचओ आपले कर्तव्य बजाविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोरोनाच्या प्रसाराबद्दलची माहिती लपवणे आणि गैरव्यवस्थापन याबाबत जागतिक आरोग्य संघटनेची समिक्षा करण्यात येत आहे. समीक्षा पूर्ण होईपर्यंत अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला निधी पूरवणार नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.