महाराष्ट्र

maharashtra

8 वर्षाच्या चिमुकल्याचा कोरोनाच्या लढ्यात पुढाकार, घरोघरी मास्कचे मोफत वाटप

By

Published : May 2, 2020, 5:42 PM IST

गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी भागात राहणाऱ्या तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने कोरोनाच्या लढ्यात पुढाकार घेतला आहे. या लहान मुलाने आपल्या घरी मास्क तयार करून त्याचे घरोघरी मोफत वाटप केले.

This 8 year old boy distributes free masks to safeguard his village
8 वर्षाच्या चिमुकल्याचा कोरोनाच्या लढ्यात पुढाकार

गाझियाबाद - उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी भागात राहणाऱ्या तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने कोरोनाच्या लढ्यात पुढाकार घेतला आहे. या लहान मुलाने आपल्या घरी मास्क तयार करुन त्याचे घरोघरी मोफत वाटप केले. मानव कसाना असे त्या 8 वर्षाच्या मुलाचे नाव आहे.

कोरोनाच्या विरोधात देशातील आरोग्य कर्माचरी, पोलीस अधिकारी लढत आहेत. अशा वेळी लोणी भागातील या मानव कसाना या 8 वर्षांच्या लहान मुलाने कोरोनापासून आपल्या गावाचे रक्षण करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्याने मास्क तयार करून त्याचे मोफत वाटप केले.

8 वर्षांच्या चिमुकल्याचा कोरोनाच्या लढ्यात पुढाकार

मानव कसाना हा 8 वर्षाचा मुलगा ईटीव्ही बोलताना म्हणाला की, 'कोरोनापासून बचाव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मास्क वापरण्याचे आवाहन जनतेला केले आहे. मात्र, त्यांच्या या आवाहनाची काही लोक थट्टा करत आहेत. आमच्या गावात एकही मेडीकल नाही. काही ठिकाणी लोक नियमांचेही पालन करत नाहीत.' उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यत 2 हजार 200 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर, 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details