महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्रप्रदेशातील 'या' गणेश मंदिरात दररोज वाढत आहे मूर्तीचा आकार

भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये गणपतीला प्रथमेशाचे स्थान आहे. गणेशाची अनेक मंदिरे देशात आहेत. या मंदिर निर्मिती मागच्या कथा फारच रंजक असून यातून अनेक संदेश आपल्याला देण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील गणेशाचे एक अद्भूत मंदिर आहे. या मंदिरामधील मुर्तीचा आकार हा चमत्कारकरित्या दररोज वाढतो.

आंध्रप्रदेश
आंध्रप्रदेश

By

Published : Aug 25, 2020, 7:07 AM IST

हैदराबाद - केवळ नामस्मरणाने उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकतेचा संचार होणाऱ्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरामध्ये सुरु आहे. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये गणपतीला प्रथमेशाचे स्थान आहे. गणेशाची अनेक मंदिरे देशात आहेत. या मंदिर निर्मिती मागच्या कथा फारच रंजक असून यातून अनेक संदेश आपल्याला देण्यात आले आहेत.

आंध्रप्रदेशातील 'या' गणेश मंदिरात दररोज वाढत आहे मूर्तीचा आकार

आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील गणेशाचे एक अद्भूत मंदिर आहे. या मंदिरामधील मुर्तीचा आकार हा चमत्कारीरित्या दररोज वाढतो. मंदिरातील गणेशाची मुर्ती आणि पाय पाहिल्यास ते आपल्या लक्षात येईल. मुर्तीला घालण्यासाठी एका भक्ताने कवच भेट दिले होते. मात्र, मुर्तीचा आकार दररोज वाढत असल्याने हे कवच घालण्यात अडचण येते. 1945 पासून ते आतापर्यंत भक्तांनी भेट दिलेली कवचे मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात संग्रहालयात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहेत.

भक्तांची संकटे दूर करण्यासाठी हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. विघ्नहर्ताचं मंदिर हे एका नदीत वसलेलं आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संकटे गणपती बाप्पा दूर करतात. मात्र, त्यापुर्वी ते भक्तांची कठीण परिक्षा घेतात, अशी मान्यता आहे. मंदिर ज्या नदीमध्ये वसलेलं आहे. त्या नदीचीही वेगळी आणि अनोखी कहाणी आहे.

संखा आणि लिखिता नावाचे दोन भाऊ होते. एकेदिवशी मोठी यात्रा केल्यावर लिखिताला जोरदार भूक लागली. तेव्हा त्याने आंब्याचं झाड पाहिलं आणि तोडण्यास सुरूवात केली. मात्र, भाऊ संखाने असं करण्यापासून रोखलं. त्यानंतर त्याच्या भावाने त्याची तक्रार पंचायतसमोर केली. पंचायतने शिक्षा म्हणून त्याचे दोन्ही हात कापले. लिखिताने कनिपक्कम जवळ असलेल्या या नदीत आपले हात टाकले आणि त्यानंतर त्याचे हात पुन्हा जोडले गेले. तेव्हापासून या नदीचं नाव बहुदा असं ठेवण्यात आल्याचं म्हटलं जातं.

हे मंदिर आपल्या प्राचीन ऐतिहासिक शिल्प आणि कलांमुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दर्शनाला येणारे भाविक मंदिरातील कुंडात आंघोळ करतात. भाविकांची अशी आस्था आहे की, येथे आंघोळ करून सर्व पाप धुतले जातात.

मंदिर बांधणीची कहाणी -

वारासिद्धी विनायक मंदिर जवळपास एक हजार वर्षांपूर्वी बांधले गेले असा ऐतिहासिक पुरावा आहे. मंदिराच्या बांधणीची कहाणी रंजक आहे. विहारपुरी नावाच्या खेड्यात तीन अतिशय हुशार बांधव होते, जे खूप सत्यवादी आणि धार्मिक होते. यातील एक मुका, दुसरा बहिरा आणि तिसरा आंधळा होता. एकदा गावात दुष्काळ पडला. तेव्हा पिण्यासाठी पुरेसे आणि शुद्ध पाणीदेखील नव्हते. दुष्काळावर मात करण्यासाठी दृढनिश्चय करून, तिन्ही भावांनीपाण्यासाठी त्यांच्या शेतात एक खोल विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आणि कामास सुरवात केली. बरेच खोदल्यानंतर एक मोठा खडक लागला. खडक हटवल्यानंतर तेथून रक्ताची धार वाहू लागली. पण एक चमत्कारही झाला. मुका, बहिरा आणि आंधळे असलेले तिन्ही भाऊ पूर्णपणे बरे झाले. हा चमत्कार पाहण्यासाठी त्या गावात राहणारे लोक जमले. यावेळी त्यांनी आणखी जमिन खोदल्यानंतर त्यांना गणेशाचे शिल्प आढळले. यानंतर सर्व लोकांनी मिळून तेथे गणपतीची मूर्ती बसविली. दरम्यान, असे मानले जाते की, हे मंदिर 11 व्या शतकातील चोल राजा कुलोटंग चोल यांनी बांधले होते.

दरवर्षी कानिपाकम येथे श्री वारासिद्धी विनायक ब्रह्मोत्सव किंवा वार्षिक पूजा विधी अतिशय खास पद्धतीने साजरी केला जातो. जवळापासच्या 14 गावातील लोक मिळून हा 21 दिवसीय उत्सव साजरा करतात. हा उत्सव 22 ऑग्सटला सुरु होतो. तर 9 स्पटेंबरला संपतो. यावर्षी कोरोनाचे सावट या उत्सावावर पडले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details