नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला आहे. यावेळी विधेयकावरील मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अनुपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला अप्रत्यक्ष पाठींबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारला अप्रत्यक्ष पाठींबा; विधेयकावरील मतदानावेळी घेणार तटस्थ भूमिका - शरद पवार
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला आहे.
वंदना चव्हाण
यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारने ३७० कलमाबाबत निर्णय घेताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे प्रतिक्रीया दिली होती.
आज संसदेत जम्मू काश्मीरच्या संदर्भात लागू असलेल्या ३७० कलमाबाबत महत्वाचा निर्णय झाला. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मांडला.