महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शौर्यस्थळ अपूर्णच; ३ वर्षानंतर काळे गेट आणि दगडांशिवाय काहीही नाही - चित्रपट

तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि आणि राज्यसभा खासदार तरुण विजय यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी शौर्यस्थळाचा शिलान्यास केला होता. परंतु, ३ वर्षे उलटुनही येथे केवळ एक काळे गेट आणि काही दगडांशिवाय काहीही दिसत नाही.

शौर्यस्थळ

By

Published : Jul 21, 2019, 3:17 PM IST

देहरादून -उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे ३ वर्षापूर्वी शौर्यस्थळ निर्मितीचे काम सुरू झाले होते. परंतु, ३ वर्षे उलटुनही शौर्यस्थळाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. कारगिल यूद्ध दिवसाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु, सैनिकांच्या शौर्याचा सम्मान करण्यासाठी अजूनही उत्तराखंड राज्यात ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.

तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि आणि राज्यसभा खासदार तरुण विजय यांनी ३० एप्रिल २०१६ रोजी शौर्यस्थळाचा शिलान्यास केला होता. परंतु, ३ वर्षे उलटुनही येथे केवळ एक काळे गेट आणि काही दगडांशिवाय काहीही दिसत नाही. शिलान्यास करताना २ कोटी रुपये खर्चून १ एकर जागेत शौर्यस्थळ बांधण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले होते. निर्माणासाठी राजस्थानी ग्रॅनाइटचा वापर करण्यात येणार होता. ३डी तंत्रज्ञानाचा वापर करताना कोणत्याही दिशेतून शौर्यस्थळ दिसेल, असेही सांगण्यात आले होते.

शौर्यस्थळाच्या आराखड्यानुसार, भारताच्या तीनही सेनांचे १५-१५ मीटर उंच ध्वज उभारण्यात येणार होते. तर, शौर्यभिंतीवर २५ मीटर उंच भारताचा ध्वज लावण्यात येणार होता. यासोबतच, शौर्यस्थळावर म्यूझिअम आणि ऑडिटोरिअम बनवण्याचीही योजना होती. यामध्ये शौर्यस्थळाला भेटी देणाऱयांसाठी देशभक्तीवर असणारे चित्रपट दाखवण्यात येणार होते. परंतु, सरकारच्या ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभारामुळे हे शौर्यस्थळ अद्याप पूर्ण होऊ शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details