नवी दिल्ली -केंद्र सरकारतर्फे देशभरात 261 लोकांना वर्गीकृत सुरक्षा पुरविली आहे. आरटीआयद्वारे हा खुलासा झाला आहे. गृह मंत्रालयाने (एमएचए) लखनऊमधील आरटीआय कार्यकर्ता नूतन ठाकूर यांना दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून एकूण 261 लोकांना वर्गीकृत सुरक्षा प्रदान करण्यात आल्याचे म्हटले आहे.
सुरक्षा सल्लागार म्हणतात...
ठाकूर यांनी केंद्र सरकारकडून ज्यांना विविध सुरक्षा कवच जसे एक्स, वाय, झेड, झेड-प्लस आदी प्रदान केले आहे, त्यांच्याविषयी माहिती मागविली होती. एमएचए व्हीआयपी सुरक्षा सल्लागार आर. चतुर्वेदी म्हणाले, की ३ डिसेंबरपर्यंत ३० जणांना झेड प्लस, 47 जणांना झेड, ६६ जणांना वाय प्लस, ५९ जणांना वाय आणि 59 जणांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे.