श्रीनगर -जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलातील एक जवान जखमी झाला आहे. सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना लपून बसलेल्या अतिरेक्यांनी अचानक जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान जखमी - सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला
जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला
या परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. रविवारी देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले होते. लष्कराच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार काश्मीरमध्ये अजूनही तब्बल 200 दहशतवादी सक्रीय असून, त्यांना पाककडून मदत मिळत आहे.