महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धोकादायक दहशतवाद जागतिक शांततेसमोर नवीन आव्हान.. - दहशतवाद

इंटरनेटच्या विस्तारामुळे, जगातील संपर्क आणि तंत्रज्ञान उद्योग क्रांतिकारी बदलांतून जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान केवळ आम्हालाच सहाय्य करत नाही तर, समाजविरोधी तत्त्वांनाही मदत करत असून यातून देशाची सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला फार मोठे आव्हान उभे राहिले आहे.

धोकादायक दहशतवाद जागतिक शांततेसमोर नवीन आव्हान..
धोकादायक दहशतवाद जागतिक शांततेसमोर नवीन आव्हान..

By

Published : Nov 30, 2019, 11:04 PM IST

देशात तांत्रिक प्रगती होण्याअगोदर, दहशतवाद्यांनी समाजाला पाठवलेले संदेश उर्वरित जगास माहीत होण्यासाठी वेळ लागत होता. तपास संघटनांकडून मिळवलेल्या संदेशांची, सत्यता पडताळून पाहण्यासाठी विश्लेषण केले जाते आणि त्यानंतरच, वृत्तसंस्था समाजाला दिलेले संदेश पोहचवत असत. मात्र, हल्लीच्या दिवसात, समाज माध्यमांचा अखंडितपणे प्रसार होत असल्यामुळे, वृत्त/संदेश जगाला कोणत्याही क्षणी जगापुढे उघड करण्यास आता काही सेकंदाचा प्रश्न उरला आहे.


दहशतवादी या वैशिष्ट्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घेत आहेत. इस्लामिक स्टेट इन इराक, सीरियाने (आयसीस) आपल्या दहशतवादी कारवाया जगभरात पसरवण्यासाठी कसा समाज माध्यमांचा उपयोग करून घेतला होता, ही गोष्ट संपूर्ण जगासाठी ही अत्यंत परिचित असलेली गोष्ट आहे.


श्रीलंकेतील इस्टर बॉम्बहल्ल्यांचा सूत्रधार झहरान हाशीमने, तरूणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी, समाज माध्यमातूनच निर्देश दिले होते. अशा प्रकारे इंटरनेटने आयसिसला आपल्या कारवाया केवळ इराक आणि सीरियापुरत्या मर्यादित न ठेवता, जगभरात फैलावण्यासाठी मार्ग मोकळा केला. अनेक कमी विकसित देशांतील इंटरनेटचा उपयोग करून,आयसीसने जगातील अनेक देशांमधून आपले सहानुभूतीदार मिळवण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या.


ते पुढे इंटरनेटचा पूर्ण उपयोग करणाऱ्या संपूर्ण विकसित देशांची निवड, संदेश सामायिक आणि पुन्हा ट्वीट करण्यासाठी करतात. अशा डावपेचामुळे, जागतिक गुप्तचर संस्था असा प्रचार कोण करत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहचण्यास सक्षम ठरत असल्या तरीही, प्रत्यक्ष गुन्हेगारांना पकडण्यात त्या कधीही यशस्वी होत नाहीत.


या प्रचारामुळे अनेक तरूणांवर प्रभाव पडला आणि ते सिरीयाला त्यांच्या कारवायांचा भाग होण्यासाठी गेले, ज्यामुळे असंख्य मृत्यू घडून आले. संगणक आणि स्मार्ट फोन एकदा इंटरनेट सेवेला जोडले की, जगभरातील समाज माध्यमावरील कोणताही संदेश, कोणत्याही निर्बंधाशिवाय, आम्हाला सहज पाहता येऊ शकतो.


या पार्श्वभूमीवर, दहशतवाद्यांचा अगदी लहानातील लहान संदेशसुद्धा देशांची सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय शांततेला फार मोठा धोका ठरू शकतो.


यावर्षीच्या मार्चमध्ये, न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरात एका गौरवर्णीय व्यक्तीने एका मशिदीत अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ५१ जण ठार झाले. हल्लेखोराच्या समाज माध्यमाच्या अकौंटवर हल्ला थेट प्रसारित करण्यात आला. ख्राईस्टचर्च कॉलिंग असे या घटनेला म्हणतात. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न आणि फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी असे पाशवी कृत्ये नियंत्रणात आणण्यासाठी पावले अगोदरच उचलली आहेत.


सुरूवातीला, इंटरनेटवर उपलब्ध असलेला दहशतवाद आणि अतिरेक्यांसंबंधी भडक तपशील हटवण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी १७ देश पुढे आले. नंतर, ३१ देशांनीही असे करण्यास मान्यता दिली आहे. फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ट्वीटर, यू ट्यूब अशा कंपन्यांनी एकत्र येऊन त्यांनी दहशतवादविरोधी जागतिक इंटरनेट मंच (जीआयएफसीटी) सुरू केला आहे. दहशतवादी संघटनांचा अतिरेकी प्रचार हा मंच ब्लॉक करतो.


तसेच समाजविरोधी माहिती, छायाचित्रे आणि व्हिडीयोचे प्रसारण होऊ नये, याची खबरदारी हा मंच घेतो. अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी संघटनेसह हा मंच काम करत आहे. जीआयएफसीटी इंटरनेटवरील दहशतवादी प्रचार चार उद्दिष्टांसाठी रोखण्याचे आवाहन करत आहे.


याचा एक भाग म्हणजे मोठ्या तांत्रिक कंपन्यांना दहशतवादविरोधी लढ्यात आणणे, नागरी समाजासाठी ऑनलाईन चर्चा मंच आयोजित करणे, दहशतवादविरोधी जागृती मोहिमेचा सामान्य जनतेला घटक बनवणे ही उद्दिष्टे असून; अ‌ॅमॅझॉन, लिंकेड इन आणि व्हॉट्स अप यांनी जीआयएफसीटीला आपला पाठिंबा दिला आहे.


संदेश पुढे पाठवण्याबाबत विशेष लक्ष देण्यात येत असून, जो आज चालू कल आहे. ज्याला आजचे नेटकरी वापरत असतात. जीआयएफसीटी नवीन शोध, माहितीचे सामायिकीकरण आणि संशोधन हे इंटरनेटवर सामायिक करून दहशतवादाचा प्रसार रोखण्यासाठी काम करतो.


ख्राईस्टचर्च प्रकारच्या घटनांमध्ये, दहशतवादी संघटनांनी माहितीचे हस्तांतरण करण्यासाठी ऑनलाईन अपलोड न करता सातत्याने अभ्यास यंत्रणा वापरण्यास सुरूवात केली आहे. आता, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि छायाचित्रे अपलोड करताना ते नाकारण्यासाठी विविध सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.


विशेषतः समाज माध्यमांवर दहशतवाद समर्थक मजकूर टाकण्यास प्रतिबंध करणारा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. भारतातसुद्धा, दहशतवादी आपल्या प्रचारासाठी समाज माध्यमांचा उपयोग करत आहेत.

हिजबुल मुजाहिदीन या समाजविरोधी दहशतवादी गटाचा काश्मिरी दहशतवादी बुरहान वाणी याने, दहशतवादाकडे तरूणांना आकर्षून घेण्यासाठी समाज माध्यमांचा संपूर्णपणे वापर करून घेतला होता.


जैश, लष्कर-ए-तैयबा यांनीही इंटरनेटला अनुकूल अशी भारताची मोहीम शोधली आहे. असे अनेक प्रसंग आहेत की, भारतीय गुप्तचर संस्थांनी काश्मीरमध्ये यावर नियंत्रण करण्यासाठी इंटरनेटचा वापर थांबवला आहे. जीआयएफसीटीने उत्पादित केलेले अनेक सॉफ्टवेअर दहशतवादी संदेश शोधून ते रोखण्यात यशस्वी ठरले आहेत.


येत्या काही दिवसात, यासाठी इंटरनेट जोडणी तोडण्याची गरज पडणार नाही. दहशतवाद नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी गुप्तचर संस्था आणि नागरी समाजाने पुढे सरसावण्याची गरज आहे.

आजच्या समकालीन जगात, ई-वाणिज्य, परिवहन, ईमेल, सामाजिक नेटवर्क आणि इतर इंटरनेट सेवा यासारख्या इंटरनेट सेवा काळाची गरज आहेत. या सेवा खंडित न होता दहशतवाद संपूर्णपणे निपटून काढला पाहिजे,कारण आमचे दैनंदिन जीवन त्यावर अवलंबून आहे. दहशतवादाविरोधातील मोठ्या लढ्याचा जेव्हा समाज भाग होईल, तेव्हा हे शक्य होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details