श्रीनगर - राष्ट्रीय तपास संस्थेने टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला येथे रविवारी सकाळी छापे मारले आहेत. टेरर फंडिंग प्रकरणी फुटीरतावादी नेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) ने कंबर कसली आहे.
टेरर फंडिंग प्रकरण : राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू काश्मीरमध्ये मारले छापे
राष्ट्रीय तपास संस्थेने टेरर फंडिंग प्रकरणी जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला येथे रविवारी सकाळी छापे मारले आहेत.
टेरर फंडिंग प्रकरण
व्यापारी आसिफ लोन, तनवीर अहमद, तारीक अहमद आणि बिलाल भट यांच्या घरावर छापे मारले आहेत. घरातून मिळणाऱ्या कागदपत्रांची तपासणी सुरु आहे.
यापुर्वी मंगळवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुलवामा आणि श्रीनगर येथील नियंत्रण रेषेपलीकडे व्यापार करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांच्या घरावर छापे मारले होते. पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली होती