महाराष्ट्र

maharashtra

सावधान..! फेक लिंकवरून आरोग्य सेतू अ‌ॅप डाऊनलोड करू नका

By

Published : May 2, 2020, 2:12 PM IST

या अ‌ॅपची लोकांमध्ये लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काही समाजकंटकांनी बनावट अ‌ॅप बनविले आहे. खऱ्या अ‌ॅपपेक्षा बनावट अ‌ॅप मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Aarogya Setu app
आरोग्य सेतू अ‌ॅप

हैदराबाद - कोरोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल आधारित अ‌ॅप विकसित केले आहे. मात्र, काही समाज कंटकांनी ह्या अ‌ॅपसारखेच बनावट (फेक) अ‌ॅप तयार केले आहे. त्यामुळे हे अ‌ॅप डाऊनलोड करताना सावधानता बाळगण्याचा इशारा हैदराबाद पोलिसांनी दिला आहे.

सध्या केंद्र सरकार सगळ्यांना आरोग्य सेतू अ‌ॅप वापरण्याचे आवाहन करत आहे. हे अ‌ॅप ब्ल्यूटुथ आणि जीपीएस लोकेशनवर चालते. या अ‌ॅपद्वारे आपण कोरोनापासून सुरक्षित आहोत की नाही हे समजते. तुमच्याजवळ कोणी कोरोना पॉझिटिव्ह किंवा संभाव्य रुग्ण आहे का? हे या अ‌ॅपद्वारे समजते.

या अ‌ॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे काही समाजकंटकांनी बनावट अ‌ॅप तयार केले आहे आहे. खऱ्या अ‌ॅपपेक्षा बनावट अ‌ॅपमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना फसविले जाऊ शकते. त्यामुळे हैदराबाद शहरातील सायबराबाद विभागीय पोलिसांनी एक पत्रक जाहीर करत फेक अ‌ॅपपासून नागरिकांना सतर्क केले आहे.

फक्त अधिकृत साईट किंवा प्लेस्टोअर वरून अ‌ॅप डाऊनलोड करा

आरोग्य सेतू अ‌ॅप फक्त प्ले स्टोअर किंवा MyGov.in संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. दुसऱ्या कोणत्याही लिंक, मेसेज, व्हॉटसअ‌ॅप मेसेज, नोटिफिकेशद्वारे आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करू नका, असे या पत्रकात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details