महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारच्या पाटण्यात झोपलेल्या तरुणीला पेट्रोल टाकून जीवंत जाळले - Burnt to death in Patna

हथिदह परिसरातील महेंद्रपूर गावात घरात झोपलेल्या एका तरुणीवर पेट्रोल टाकून जाळण्यात आले. गावातील काही तरुणांनी हे कृत्य केले आहे. जखमी तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संतप्त गावकर्‍यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.

bihar
बिहारच्या पाटण्यात झोपलेल्या तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले

By

Published : May 26, 2020, 12:17 PM IST

पाटणा (बिहार)– जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही अपराधिक घटना वाढत आहेत. जिल्ह्यात एका तरूणीला जीवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना मोकामा भागातील महेंद्रपूर गावात घडली.

ही तरुणी घरात तिच्या आईसोबत झोपली होती. पहाटे आरोपींनी तरुणीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळले. तरुणी मोठ्या प्रमाणात भाजली गेली. तर, आरोपी घटनास्थळाहून फरार झाले.

नातेवाईकांनी तरुणीला तात्काळ मरांची येथे रुग्णालयात नेले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. तिच्या मृत्यूची बातमी कळताच संतप्त गावकऱ्यांनी तिच्या मृतदेहासह आंदोलन केले. रस्ता जाम करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. स्थानिक प्रशासनाने लोकांना शांत केले. दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details