महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'लक्ष्य-आधारित कर संकलन हा नवीन कर दहशतवाद' - रणदीप सुरजेवाला

देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान करणारी पारदर्शी करसुधारणांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरुवारी केली. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

रणदीप सुरजेवाला
रणदीप सुरजेवाला

By

Published : Aug 15, 2020, 8:07 AM IST

नवी दिल्ली - देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान करणारी पारदर्शी करसुधारणांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरुवारी केली. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लक्ष्य-आधारित कर संकलन हा नवीन कर दहशतवाद आहे. 'कर अराजकता , कर दहशतवाद आणि ईडी-आयकरांचे छापे हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. तसेच मोदी सरकारमध्ये 'प्रामाणिकतेचा सन्मान म्हणजे अप्रामाणिकतेचा सन्मान', असे सुरजेवाल यांनी म्हटलं आहे. ही करप्रणाली मोदी सरकारने गेल्या 6 वर्षांत का लागू केली नाही, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी दिलेले भाषण पुन्हा शुक्रवारी केले. सरकारने गेल्या 5 वर्षात थेट कराच्या थकबाकीत 129 टक्के वाढ केली. मोदी सरकारच्या 'पारदर्शी करप्रणालीची वास्तविकता म्हणजे, आयकर थकबाकीत अनेक पटींनी वाढ, असे सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

2020 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार 9,40,000 कोटी रुपयांची थेट कर रक्कम विवादांच्या कक्षेत आहे. दुसरीकडे मार्च 2014 मध्ये थेट कर थकबाकी 4,10,000 कोटी रुपये होती. म्हणजेच मागील पाच वर्षात थकबाकी 129 टक्क्यांनी वाढली आहे, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details