तिनदिवनम (तामिळनाडू) - अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे खासदार एस. राजेंद्रन (वय ६२) यांचा कार अपघातात मृत्यू झाला. आज (शनिवार) सकाळी तिनदिवनम येथे त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या खासदाराचा अपघातात मृत्यू - अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे खासदार एस. राजेंद्रन (वय ६२) यांचा कार अपघातात मृत्यू झाला. एस. राजेंद्र हे रासायनिक आणि खते मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य होते. तसेच ते नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीचेही सदस्य होते.
तामिळ1
विलुपूरम मतदार संघातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राजेंद्रन हे निघाले होते. तिनदिवनम येथून जात असताना त्यांची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील इतर काहीजण जखमी झाले. अपघातानंतर जखमी वाहन चालकाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एस. राजेंद्र हे रासायनिक आणि खते मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य होते. तसेच ते नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीचेही सदस्य होते.