नवी दिल्ली -बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सत्तेत येण्यासाठी पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. कोरोनाकाळात होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. निवडणुकीत नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने देतात. मात्र, मतदारांनी नेत्यांना आश्वासन दिल्याचे तुम्ही कधी पाहिले नसेल. 'आम्हाला घरी पोहचवा. आम्ही तुम्हाला मतदान करू,' अशी ऑफर लॉकडाऊनमुळे हरयाणामध्ये अडकलेल्या बिहारच्या स्थलांतरित कामगारांनी राजकीय पक्षांना दिली आहे.
'आम्हाला घरी पोहचवा, आम्ही तुम्हाला मतदान करू', बिहारी कामगारांची नेत्यांना ऑफर - बिहारी कामगार न्यूज
लॉकडाऊनमुळे हरयाणामध्ये अडकलेल्या बिहारच्या स्थलांतरित कामगारांनी 'आम्हाला घरी पोहचवा. आम्ही तुम्हाला मतदान करू,' अशी ऑफर राजकीय पक्षांना दिली आहे. एखाद्या नेत्याने आम्हाला घरी सोडले तर, निश्चितच आम्ही त्यांना मतदान करू, असे मोहम्मद निझाम या कामगाराने म्हटलं आहे.
कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर कामाच्या शोधात गेलेले कामगार आपल्या राज्यात परतले आहेत. मात्र, अद्यापही पैशाच्या अभावी काही कामगार इतर राज्यात अडकून पडली आहेत. हरयाणामध्ये बिहारमधील काही कामगार अडकली आहे. त्यांची कामे बंद पडली असून त्यांच्याकडे घरी परतण्यासाठी पैसे नाहीत.
'रोहतकमध्ये काम शोधण्यासाठी आलो होतो. मात्र, आता आमच्याकडे परत जाण्यासाठीही पैसे नाहीत. एखाद्या नेत्याने आम्हाला घरी सोडले. तर निश्चितच आम्ही त्यांना मतदान करू, असे मोहम्मद निझाम या कामगाराने म्हटलं आहे.