महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जलतरणपटू ऋजुता खाडेने जिंकले सुवर्णपदक - सुवर्णपदक

लग्नानंतर  ऋजुताने पोहणे सोडून दिले होते.  मात्र, तिचा नवरा जो स्वत: एक जलतरणपटू आहे, त्याने  ऋजुताला पुढे हा खेळ सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे  ऋजुताने पुन्हा  पोहायला सुरुवात केली.  ऋजुता ही भारताच्या वेगवान जलतरणपटू, वीरधवल खाडे यांची पत्नी आहे.

ऋजुता खाडे

By

Published : Sep 2, 2019, 9:04 PM IST

भोपाळ- भोपाळ येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ जलतरण स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी झालेल्या महिला 50 मीटर फ्री स्टाईल शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋजुता खाडेने सुवर्णपदक जिंकले.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जलतरणपटू ऋजुता खाडेने जिंकले सुवर्णपदक

लग्नानंतर ऋजुताने पोहणे सोडून दिले होते. मात्र, तिचा नवरा जो स्वत: एक जलतरणपटू आहे, त्याने ऋजुताला पुढे हा खेळ सुरु ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ऋजुताने पुन्हा पोहायला सुरुवात केली. ऋजुता ही भारताच्या वेगवान जलतरणपटू, वीरधवल खाडे यांची पत्नी आहे. वीरधवल नेहमीच ऋजुताला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. भारताच्या वेगवान जलतरणपटूची पत्नी होण्याचा दबाव नेहमीच ऋजुताला जाणवतो. त्यामुळे उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ती खूप मेहनत करते.


आगामी चॅम्पियनशिपबद्दल, ऋजुताने खुप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे बंगळुरु येथे होणाऱ्या आशियाई चँपियनशिपसाठी तिची निवड होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details