महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CAA विरोधी प्रदर्शन : योगेंद्र यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - राजघाटावर सीएएविरोधी प्रदर्शन

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये देशभरात आंदोलन सुरू आहे.

योगेंद्र यादव
योगेंद्र यादव

By

Published : Jan 30, 2020, 8:39 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधामध्ये देशभरात आंदोलन सुरू आहे. सीएएविरोधात गुरवारी राजघाटावर प्रदर्शन सुरू होते. यामध्ये अनेक नेत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी योगेंद्र यादव यांच्यासह काही नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

राजघाट येथे CAA या कायद्याविरोधात प्रदर्शनादरम्यान मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यावेळी स्वराज अभियानचे नेता योगेंद्र यादव,सीपीआय नेता वृंदा करात, डी. राजा, यांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. यावेळी दिल्ली पोलिसांनी राजघाट येथील स्वराज अभियानचे नेता योगेंद्र यादव आणि वकील प्रशांत भूषण यांना ताब्यात घेतले.
'माझ्यासह प्रदर्शन करणाऱ्या इतर 50 जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आम्ही केवळ राष्ट्रध्वजासह उभे होतो आणि राष्ट्रगीत गात होतो. येथे कलम 144 लागू करण्यात आले नव्हते. तरीही खेचून बसमध्ये ढकलले', या आशयाचे टि्वट योगेंद्र यादव यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details