नवी दिल्ली - ‘प्रत्येक परदेशी उत्पादनावर बहिष्कार घालणे, असा स्वदेशीचा अर्थ नाही. आपल्यासाठी योग्य असलेली वस्तू आपण खरेदी करू. तिही आपण स्वतः ठरवलेल्या अटींवर. जगभरातील आपल्यासाठी जे चांगले आहे, त्या सर्व बाबी आपण घेऊ, असा याचा अर्थ आहे,’ असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्हर्च्युअल बुक लॉन्च कार्यक्रमात केले आहे.
आपण परदेशातून जे घेतो ते आपापल्या गरजेनुसार असले पाहिजे स्वदेशी या संकल्पनेत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि परकीय गुंतवणूक व वस्तूंचा ओघ रोखणे याचा आग्रह धरला आहे.
आरएसएस प्रमुखांनी स्वावलंबी आणि स्वदेशी होणे अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. ‘कोविड -19 या महामारीमुळे एकाच प्रकारचे अर्थशास्त्रीय मॉडेल जगभरात सगळीकडे योग्य ठरू शकणार नाही, हेच सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. यातून जागतिकीकरणाचे ही अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत, हेही ही समोर आले आहे, असे ते म्हणाले. याच्या पुढे जाऊन स्वावलंबी असलेल्या देशांमध्ये परस्पर सहकार्याचीही आवश्यकता आहे. सर्वांनी ’जगाला एक बाजार नव्हे तर, एक कुटुंब' समजले पाहिजे, हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले.