श्रीनगर - जम्मू काश्मीरमधून पोलिसांनी एका कबुतराला ताब्यात घेतले आहे. हे कबूतर पाकिस्तानचे गुप्तहेर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून या कबुतराला ताब्यात घेण्यात आले.
पाकिस्तानमधून आलेले 'गुप्तहेर कबूतर' पोलिसांच्या ताब्यात.. - गुप्तहेर कबूतर अंगठी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मण्यारी गावातील काही लोकांनी या कबुतराला पकडले. त्यानंतर त्यांनी ते कबूतर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कबुरताच्या पायाला एक अंगठी बांधण्यात आली होती.
पाकिस्तानमधून आलेले 'गुप्तहेर कबूतर' पोलिसांच्या ताब्यात..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मण्यारी गावातील काही लोकांनी या कबुतराला पकडले. त्यानंतर त्यांनी ते कबूतर पोलिसांच्या ताब्यात दिले. या कबुरताच्या पायाला एक अंगठी बांधण्यात आली होती. या अंगठीवर काही आकडे कोरण्यात आले होते. कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.
या कबूतराच्या पायाला बांधलेला संदेश काय आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. गुप्तचर यंत्रणा हा कोड डीकोड करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.