महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

..त्यावेळी सुषमा स्वराजांनी पंतप्रधान मोदींना भरला होता दम! - अमेरिकेचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुषमा यांच्याविषयी एक प्रसंग सांगितला होता. 'ते काही नाही तुम्हाला माझं ऐकावचं लागेल' असा आग्रहवजा दमच त्यांनी मोदींच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यावेळी भरला होता.

नरेंद्र मोदी

By

Published : Aug 7, 2019, 10:12 PM IST

Updated : Aug 7, 2019, 10:27 PM IST

नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुषमा यांच्याविषयी एक प्रसंग सांगितला होता. 'ते काही नाही तुम्हाला माझं ऐकावचं लागेल' असा आग्रहवजा दमच त्यांनी मोदींच्या पहिल्या अमेरिका दौऱ्यावेळी भरला होता.


2014 मध्ये निवडून आल्यानंतर मोदींनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुन भाषण दिले होते. व्यासपीठावर भाषण देताना तुम्ही अस्वस्थ झाले होते का? असा प्रश्न अक्षय कुमार याने मुलाखतीमध्ये मोदींनी विचारला होता. यावर मोदींनी सुषमा यांची आठवण सांगितली.


'माझा अती आत्मविश्वास ही माझी अडचण आहे. मी भाषण काय द्यायचे याविषयी माझ्या मनात विचार करून गेलो होतो. मात्र सुषमा यांनी मला भाषण लिहून वाचण्याचा आग्रह केला. यावर आम्ही बरीच चर्चा केली. मात्र त्यांनी तुम्हाला माझं ऐकावचं लागेल, असे म्हणत मला पेपरवरील भाषण वाचून द्यायला लावले, असे मोदींनी मुलाखतीमध्ये अक्षय कुमारला सांगितले.


मोदींच्या या मुलाखतीनंतर सुषमा यांनी टि्वट करत मोदींचे आभार मानले होते. ती घटना तुमच्या जशीच्या तशी लक्षात आहे. यात तुमचे मोठेपण आहे, असे टि्वट त्यांनी केले होते.


भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीमधील जंतर मंतर येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि नेते अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी नरेंद्र मोदी सुषमाजींना श्रद्धांजली वाहताना भावूक झाले होते. मोदी यांनी आपल्या ट्विटरवरुन 'भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं', अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Last Updated : Aug 7, 2019, 10:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details